TRENDING:

पसूल जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : पसूलमध्ये सत्ता कुणाची? विश्वजीत कदमांना बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश?

Last Updated:

Sangli Pasul ZP election result 2026 :दुधोंडी गटामध्ये देखील राजकीय संघर्ष तीव्र असून, तिथे काँग्रेसच्या वर्षा जाधव आणि भाजपच्या अनिता पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Pasul ZP election result 2026 : पसूल तालुक्यात आमदार विश्वजीत कदम आणि आमदार अरुण लाड यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पलूसमध्ये प्रामुख्याने कुंडल आणि दुधोंडी यांसारख्या गटांमध्ये होणाऱ्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने पलूसवर आपले वर्चस्व कायम राखले असले, तरी जिल्हा परिषदेत भाजप त्यांना तगडे आव्हान देताना दिसत आहे.
Sangli Pasul  ZP  election result 2026
Sangli Pasul ZP election result 2026
advertisement

दुधोंडी गटामध्ये देखील राजकीय संघर्ष तीव्र असून, तिथे काँग्रेसच्या वर्षा जाधव आणि भाजपच्या अनिता पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. पलूस तालुक्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेससमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत विश्वजीत कदम आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
सर्व पहा

आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला या सर्व 4 गटांचे निकाल जाहीर होणार असून, विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील मतदारांनी नोंदवलेला विक्रमी टक्का हा प्रस्थापित सत्तेच्या बाजूने जातो की परिवर्तनाची लाट आणतो, हे काही तासांतच स्पष्ट होईल. पलूसच्या या निकालाचा परिणाम केवळ तालुक्यावरच नाही, तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणावर होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
पसूल जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : पसूलमध्ये सत्ता कुणाची? विश्वजीत कदमांना बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल