TRENDING:

साताऱ्यात भाजपचा गेम होणार? राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार, गुप्त बैठकांना वेग, नेमकं काय घडतंय?

Last Updated:

Satara ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्याच्या राजकारणात आता नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्याच्या राजकारणात आता नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. साताऱ्यातील 'हॉटेल फर्न'मध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

दिग्गज नेत्यांची गुप्त बैठक

जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. या बैठकीला दोन्ही बाजूंचे दिग्गज नेते उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण आदि नेते उपस्थित होते.

advertisement

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. भाजपनं सर्वाधिक २७ जागा जिंकल्या आहेत. भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ६ सदस्यांची गरज आहे. पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० आणि शिवसेना शिंदे गटाकडे १५ सदस्य आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येत साताऱ्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने गुप्त बैठका घेतल्या जात आहेत.

advertisement

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. "जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ही केवळ प्राथमिक चर्चा आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही," अशी प्रतिक्रिया मकरंद पाटील यांनी दिली आहे. तर मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र सत्तास्थापने संदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते.

advertisement

सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

भाजप : 27

राष्ट्रवादी काँग्रेस : 20

शिवसेना : 15

शिवसेना (ठाकरे) :00

काँग्रेस : 01

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

इतर: 02

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साताऱ्यात भाजपचा गेम होणार? राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार, गुप्त बैठकांना वेग, नेमकं काय घडतंय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल