TRENDING:

राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत गेल्या, सभापती झाल्या, साताऱ्यातला 'पलटी पॅटर्न' चर्चेत!

Last Updated:

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता आल्यानंतर शनिवारी सभापतीनिवडी बिनविरोध झाल्या. राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे आणि लता कर्णे यांच्यासह भाजपच्या दोघांची वर्णी लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महत्त्वाच्या चार सभापती पदांसाठी आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडली. यामध्ये महिला व बाल कल्याण, समाज कल्याण आणि दोन विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड करण्यात आली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
सातारा जिल्हा परिषद
सातारा जिल्हा परिषद
advertisement

चारही सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज न भरल्याने भाजपाच्या वतीने प्रत्येक सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकृतपणे घोषित केले.

राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे महिला बालकल्याण सभापती

सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रथमच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभापती निवडीवर बहिष्कार टाकल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा विराज शिंदे यांची निवड झाली आहे. तर समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

advertisement

याव्यतिरिक्त, अन्य दोन विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नवीन सभापतींचे भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

सुरुवात त्यांनी केली… शेवट आम्ही करणार!, मकरंद पाटील यांचा भाजपला इशारा

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या चार सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीतून झालेल्या फुटीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपला थेट इशारा दिला आहे. पाटील म्हणाले, "राजकारणात आमचे सदस्य फोडण्याची सुरुवात त्यांनी केली आहे, पण शेवट आम्ही करणार. आम्ही काल राजकारणात आलो नाही, आमच्या पन्नास वर्षांच्या पिढ्या या राजकारणात काम करत आहेत".

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख करत, कराडमध्ये सर्वपक्षीय निषेध नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले. संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कोर्टात गेल्याचे सांगत, कोर्टाने प्रशासनावर ओढलेले ताशेरे हा आमचा विजय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत गेल्या, सभापती झाल्या, साताऱ्यातला 'पलटी पॅटर्न' चर्चेत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल