वयाने मोठ्या युवतीवर प्रेम
साताऱ्याजवळ वसतिगृहात राहून मृत विद्यार्थी शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर तो हॉस्टेलला आला. तेव्हा त्याच्या डोक्यात अभ्यासाचा ताण होता. तसेच घरचे वयाने मोठ्या असलेल्या मुलीला विरोध करतील, याचा सतत विचार त्याच्या डोक्यात चालू होता. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या युवतीवर त्याचं प्रेम होतं. 17 वर्षाच्या मुलाला एक मोठी बहिण होती. तिचं एका मुलावर प्रेम होतं. मात्र, कुटुंबीयांकडून मुलीच्या प्रेमाला विरोध होता. कुटुंबीयांकडून आपल्या प्रेमालाही बहिणीप्रमाणेच विरोध होईल, याची भीती या मुलाला होती.
advertisement
वडिलांना व्हॉटसॲपवर चिठ्ठी
17 वर्षाच्या मुलगा शुक्रवारी हॉस्टेलवर आला अन् त्यानंतर तो तणावात होता. त्यावेळी त्याने टोकाचा निर्णय घेतला. मध्यरात्री त्याने चिठ्ठी लिहिली आणि वडिलांना व्हॉटसॲपवर पाठवली. दुसऱ्या दिवशी वडिलांनी जेव्हा मेसेज पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. तातडीने वडिलांनी मुलाला फोन केले. घरच्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
कुटुंबियांनी हंबरडा फोडला
दरम्यान, सातारा पोलिसांनी या प्रकरणात पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला, त्यानंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला. पोलीस हवालदार किरण निकम तपास करीत आहेत. अवघ्या 17 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
