महिला डॉक्टरला रोज डायरी लिहिण्याची सवय
फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना त्या नियमित दैनंदिनी लिहीत असल्याचे समोर आलं आहे. यामध्ये प्रामुख्याने शवविच्छेदन अहवालाच्या नोंदीबरोबरच दबावाबद्दलचा तपशीलही नमूद केल्याचं तपासात पुढं आलं आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, या महिला डॉक्टरला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. यामध्ये त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटनांची नोंद करून ठेवत होत्या. त्यामुळे संशयास्पद तपशील समोर येण्याची शक्यता देखील आहे.
advertisement
राजकारण्यांकडून दबाव येत होता
महिला डॉक्टरच्या व्यक्तीगत गोष्टींपासून ते शवविच्छेदन अहवालाच्या नोंदीदेखील त्यांनी नोंद करून ठेवलेल्या आहेत. या डायरीमुळे मदत होईल. याशिवाय मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर पोलीस, डॉक्टर व राजकारण्यांकडून कसा दबाव येत होता, याबाबतची नोंद देखील या डायरीमध्ये असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितलं आहे.
डायरीमधून काय समोर आलं?
दरम्यान, संबंधित महिला डॉक्टर फलटम उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यानी फलटणशिवाय सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणीही कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्याकडून या महिला डॉक्टरांबाबत माहिती गोळा केली जात असल्याचं देखील तुषार दोशी यांनी सांगितलं आहे.
