TRENDING:

अति तिथे माती, माणसं संधीची वाट पाहतात, लक्षात ठेवा... शंभूराज देसाईंचा भाजपवर हल्ला

Last Updated:

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात देसाई यांच्या गटाने पाटणमध्ये जोरदार कामगिरी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी, पाटण, सातारा: अति तिथे माती! कुठे जाऊन काही अति केले तर माणसे सुद्धा योग्य संधी आणि योग्य वेळेची वाट पाहत असतात, अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ला चढवला. माणसाने जास्त अति करू नये, असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला.
शंभूराज देसाई
शंभूराज देसाई
advertisement

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाटणमध्ये येऊन शंभूराज देसाई यांच्याविरोधात प्रचार केला. हाच प्रचार शंभूराज देसाई यांच्या जिव्हारी लागला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात देसाई यांच्या गटाने पाटणमध्ये जोरदार कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील राग बोलून दाखवला.

अति तिथे माती, माणसं संधीची वाट पाहत असतात

advertisement

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर, आणि शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले होते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमध्ये विजयी सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला टोले लगावले.

निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली, पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा. एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप... बेरीज काय झाली? अति तिथे माती होते… अति जाऊन कुठे काही केले तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात, असे म्हणत देसाईंनी भाजपवर निशाणा साधला.

advertisement

पाटणचा निकाल काय लागला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातपैकी सहा गट तर पंचायत समितीच्या १४ पैकी १३ गणांत शंभूराज देसाई गटाने निर्विवाद यश मिळवले. तालुक्यातील जनतेने देसाई गटाच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने त्यांनी पाटण पंचायत समितीत एकहाती सत्ता मिळवली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अति तिथे माती, माणसं संधीची वाट पाहतात, लक्षात ठेवा... शंभूराज देसाईंचा भाजपवर हल्ला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल