नवीन पदावर कामाला सुरूवात - शंतनू नायडू
मला हे सांगताना आनंद होत आहे की, मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, हेड - स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज या नवीन पदावर कामाला सुरूवात केली आहे. मला आठवतंय की, जेव्हा माझे वडील टाटा मोटर्स प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी येत असत आणि मी खिडकीत त्यांची वाट पाहत असायचो. आता हे वर्तुळ पूर्ण झालंय, असं शंतनू नायडू याने म्हटलं आहे.
advertisement
पाहा पोस्ट
कोण आहे शंतनू नायडू?
शंतनू हा ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनियर आहे आणि त्याने कॉर्नेलमधून एमबीए देखील केले आहे. रतन टाटा यांनीच शंतनूला कॉर्नेलमधून एमबीए करण्यास मदत केली होती. यानंतर रतन टाटा स्वतः शंतनूच्या पदवीदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठात पोहोचले. नंतर शंतनूला टाटांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शंतनूचीही स्वतःची कंपनी आहे. ज्याचे नाव गुडफेलो. ही कंपनी कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टर कॉलर बनवते. जे अंधारात चमकतात आणि रस्त्यावरील अपघातांपासून त्यांचे संरक्षण करतात.
दु:ख ही प्रेमाची किंमत - शंतनू नायडू
दरम्यान, रतन टाटांच्या निधनाची माहिती मिळताच शंतनू नायडूवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी शंतनू नायडूची पोस्ट व्हायरल झाली होती. तुमच्या जाण्यानं आमच्या मैत्रीत जी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढण्यासाठी मी आयुष्य घालवेन. हे दु:ख प्रेमाची किंमत आहे. गूडबाय माय लाइटहाउस असं म्हणत शंतनू नायडूने दु:ख व्यक्त केलं होतं.