TRENDING:

Maha Vikas Aghadi: मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीचा गेम ओव्हर? शिवालयातील बैठकीकडे राष्ट्रवादीची पाठ!

Last Updated:

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीच्या (मविआ) भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज मुंबईतील 'शिवालय' येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांनी दांडी मारली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या (मविआ) भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज मुंबईतील 'शिवालय' येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांनी दांडी मारल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर महत्त्वाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित राहिल्याने "मविआ राज्यात संपुष्टात आली आहे का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीचा गेम ओव्हर? शिवालयातील बैठकीकडे राष्ट्रवादीची पाठ!
मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीचा गेम ओव्हर? शिवालयातील बैठकीकडे राष्ट्रवादीची पाठ!
advertisement

नेमकं काय घडलं?

सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही मोठा नेता बैठकीत न दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

advertisement

विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह

राज्यातील महायुती सरकारचा विधीमंडळात एकत्रितपणे विरोध कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित होती. मागील काही काळातील घटनांमुळे महायुतीवर पलटवार करण्याची संधी विरोधकांच्या हाती आहे. जनतेच्या विविध मुद्यांवरही सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाणार होती. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे मविआमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे मतभेद आहेत की आणखी काही राजकीय समीकरणे शिजत आहेत, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

advertisement

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत वाद असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने संख्याबळाच्या आधारे आपला दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने शरद पवारांच्या नावावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यावरूनही मविआत आलबेल नसल्याची चर्चा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुणेकरांसाठी खास मेजवानी, हे पहिल्यांदाच..
सर्व पहा

आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनासाठीच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहणार असतील, तर आगामी काळात मविआ सरकारविरोधात कशा प्रकारे लढा देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maha Vikas Aghadi: मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीचा गेम ओव्हर? शिवालयातील बैठकीकडे राष्ट्रवादीची पाठ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल