सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट निवडणुकांत परस्पर टीका करत असले तरी मतविभाजन टाळण्यासाठी ही केवळ दिखाऊ लढाई असल्याचे जाणकर सांगतात. असे असले तरी निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय धमाका होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. तो धमाका न झाल्यास हे देखील ठरवून केलेले राजकारण असल्याची शंका कायम राहणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे बोलत होते.
advertisement
जर शिंदे यांच्यावर महायुतीत अन्याय झाला तर...
भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार का? या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, या युतीबाबत मी आज काही सांगू शकत नाही. जर एकनाथ शिंदे यांच्यावर महायुतीत अन्याय झाला तर ते भविष्यात काय निर्णय घेतील हे आत्ताच सांगता येणार नाही, असे सूचकपणे सांगत भविष्यातील नव्या समीकरणाचे संकेत त्यांनी दिले.
शिंदेसेना-राष्ट्रवादीची कुर्डूवाडीतील युती भविष्यातील नांदी- शशिकांत शिंदे
याआधीही शिंदेसेनेसोबतच्या युतीवर शशिकांत यांनी सूचक संकेत दिले होते. राज्यभरात सध्या अनेक युती आघाडी होत आहेत. मात्र, कुर्डूवाडीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आमची युती भविष्यातील नांदी देखील ठरू शकते, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले होते.
