एकूणच ही सगळी प्रकरणं ताजी असताना आता आणखी एका घटनेची यात भर पडली आहे. नागपूर पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या नागपूर शहर प्रमुखावर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याच्या हॉटेलवर छापेमारी करत मोठं कांड उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या बजाजनगर येथील अपना धाबा एनएच १ या हॅाटेलवर छापेमारी केली.
advertisement
तेव्हा पोलिसांना हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारुसाठा आढळला आहे. पोलिसांनी सर्व दारुसाठा जप्त केला असून हॉटेलवर कारवाई करत हॅाटेलला कुलूप लावलं आहे. तसेच पोलीसांनी हॅाटेल संचालक मंगेश काशीकर आणि भरत दुबे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला. शिवाय याच परिसरातील बकासूर रेस्टॅारेंटवरंही पोलीसांनी कारवाई केली.
नागपूर शहरातील शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या हॉटेवर अशाप्रकारे कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे विविध नेते एकामागून एक अडचणीत सापडत असताना आता आणखी एक नेता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. आता मंगेश काशीकर यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
