TRENDING:

पतीच्या निधनाचा धक्का, पत्नीनेही सोडले प्राण, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार; साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

Last Updated:

पतीच्या अकाली निधनाने धक्का बसलेल्या पत्नीचा देखील दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे,  प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गोंदिया : पती-पत्नीचं नातं हे संसाराच्या दोन चाकाप्रमाणे असतं. शेवटपर्यंत ते एकमेकांना साथ देत असतात. अशा अनेक घटना आपण पाहतो, पण गोंदिया जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या अकाली निधनाने धक्का बसलेल्या पत्नीचा देखील दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला आहे. डोळ्यात पाणी आणणारी ही घटना जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडली असून घटनेनंतर पती-पत्नीच्या पार्थिवावर  एकाच सरणावर दोघांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. हे. गोविंदा बोरकर (80) व त्यांच्या पत्नी अंजनाबाई बोरकर मअसं मयत दाम्पत्याचे नाव आहे.

advertisement

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडलेल्या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. एका वृद्ध दांपत्याने एकापाठोपाठ प्राण सोडले. या धक्कादायक घटनेमुळे अनेकांकडून हळहळ होत आहे. गोविंदा बोरकर आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई बोरकर हे वृद्धपणाच्या काळात दोघेही एकमेकांचे आधार झाले. मात्र 12 फेब्रुवारीला गोविंदा यांचे निधन झाले. हा धक्का अंजनाबाई यांच्यासाठी मोठा आघात होता. पतीच्या निधनामुळे त्या मनातून हादरून गेल्या. हा दुःखवियोग त्या पचवू शकल्या नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच अंजनाबाई यांचीही प्रकृती अचानकपणे खालावली.

advertisement

नातलगांनी अखेरचा निरोप दिला 

तब्येत खालवल्यानंतर त्या अत्यावस्थ झाल्या. अशातच त्यांनीही पतीच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. आयुष्याची 50 वर्षे एकमेकांच्या साथीने घालविल्यावर जगाचा निरोपही सोबतच घेणाऱ्या या दांपत्यावर अंत्यसंस्कारही सोबतच करण्यात आले. नातलग आधीपासूनच उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनाही एकाच वेळी नातलगांनी अखेरचा निरोप दिला. हा संपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडला.

advertisement

कुटुंबियावर काही क्षणातच दुःखाच डोंगर कोसळला

लग्नाला 50  वर्ष पूर्ण झाले होते. त्यांनी ५० वर्ष एकत्र संसाराचा गाडा चालवला.  गावातील नागरिक, नातेवाईक घरासमोर जमले होते. अंतविधीची तयारी सुरु असताना पतीच्या निधनाने हंबरडा फोडत अंजनाबाई यांनी देखील प्राण सोडले. सुखी संसाराच्या या कुटुंबियावर काही क्षणातच दुःखाच डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेहावर एकाच वेळी अंतविधी करण्यात आला. घरातील दोन प्रमुख व्यक्तींचे एका पाठोपाठ निधन झाल्याने हळहळ व्यक्त होतं आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दुसऱ्यांची मनं वाचणारे डॉक्टरच प्रेमात वेडे; घरचा विरोध अन् जातीची भिंत, काय केल
सर्व पहा

Mankhurd Crime: त्याला घरी नेलं, संबंध ठेवले आता..., 19 वर्षीय तरुणींच्या दहशतीने मुलगा पोहोचला पोलिसांकडे! मुंबईतली अजब घटना

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पतीच्या निधनाचा धक्का, पत्नीनेही सोडले प्राण, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार; साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल