TRENDING:

आई आणि बहीण घरी लेकाची वाट पाहात होते, पण घरी आला सोहेलचा मृतदेह

Last Updated:

निलंगा तालुक्यात कवठी पाटी तुपडी रस्त्यावर दोन बाईकची धडक, सोहेल शेख आणि अमर देशमुख यांचा मृत्यू, दोन्ही कुटुंबांचा आधार हरपला, गावात शोककळा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
माझा लेक आता येईल आणि आपण सोबत उरूस साजरा करू असे आईच्या तोंडातून निघाले. बहीणही त्यामुळे थांबली, आई आणि बहीण त्याची वाट पाहात बसले होते. मात्र हे वाट पाहाणं आता कधीच संपणार नाही याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. लेक घरी येण्याऐवजी थेट पोलीस आले आणि त्यांचे जे सांगितलं ते पाहून आई आणि बहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली.
लेकाची वाट पाहून आईचे डोळे थकले पण घरी आला सोहेलचा मृतदेह
लेकाची वाट पाहून आईचे डोळे थकले पण घरी आला सोहेलचा मृतदेह
advertisement

डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मन सुन्न झालं हात पाय थरथरायला लागले. कारण आता सोहेल परत कधीच घरी येऊ शकणार नव्हता. उरूस साजरा करण्यासाठी जी वाट पाहात होते तो आता साजरा होणार नव्हता. सोहेलचा मृतदेह घरी आला होता.

निलंगा तालुक्यातील कवठी पाटी ते तुपडी मार्गावर रविवार दुपारी काळानं घाला घातला. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झााला. दुचाकीची समोरसमोर धडक झाली आणि त्यातून सोहेल शेख आणि अमर सुनील देशमुख या दोन तरुणांचा मृत्यू झाला. उरूस साजरा करण्यासाठी निघालेल्या सोहेलवर काळानं झडप घातली. या प्रवासाचा शेवट इतका भीषण असेल याची कल्पनाही कुणी नव्हती केली.

advertisement

उसने पैसे देताना दहावेळा विचार करा! पुण्यात पैसे परत मागताच समोरच्याची सटकली, पिस्तूल काढला अन्...

सोहेल हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. तो ऑनलाइन सेंटर चालवून आपलं घर सांभाळत होता. उरुसासाठी आई आणि बहीण आधीच आजोळी पोहोचल्या होत्या, सोहेल काम असल्यामुळे त्यांच्यासोबत जाऊ शकला नाही तो मागून येणार होता. मात्र त्याची वाट पाहून आईचे डोळे थकले तो काही आला नाही. त्याचा मृतदेह समोर आल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

advertisement

उरुसासाठी सोहल मोठ्या उत्साहाने निघाला. समोरून येणाऱ्या बाईकसोबत त्याची धडक झाली. अपघात भीषण होता त्यामुळे मार लागला होता. गाड्यांचंही नुकसान झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका अखंड दगडात कोरलेलं मंदिर, दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना, पुण्यातील राष्ट्रकूट वंश काळातील लेणी
सर्व पहा

दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गौर गावच्या अमर देशमुखाचं कुटुंब हे शेतीवर उदरनिर्वाह करून राहात आहे. तुपडी इथे घरी परत जात असताना भीषण अपघात झाला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं खरं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही कुटुंबाचा आधार हरपला आहे. सुसाट वेळामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई आणि बहीण घरी लेकाची वाट पाहात होते, पण घरी आला सोहेलचा मृतदेह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल