Solapur Municipal Corporation Election 2026 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीतून 11 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे शिवसेना उबाठाचे हे 11 उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
सोलापूरात महाविकास आघाडीतू उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढते आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 30 जागा आल्या आहेत.त्यापैकी 11 उमेदवारांची पहिली यादी केली शिवसेना उबाठाने जाहीर केली आहे. शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी ही उमेदवार यादी जाहीर केली आहे.आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटा पाठोपाठ शिवसेना उबाठाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.या यादीत 11 उमेदवार कोणत्या प्रभागातून लढणार आहेत? हे पाहूयात.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाठाची पहिली यादी
प्रभाग १ अ : रमेश व्हटकर
प्रभाग २ ड : दिनेश चव्हाण
प्रभाग ४ क : प्रिया बसवंती
प्रभाग ६ ड : गणेश वानकर
प्रभाग ९ ड : सुरेश गायकवाड
प्रभाग ११ अ : शुभम स्वामी
प्रभाग १२ अ : प्रसाद माने
प्रभाग १३ ड : वल्लभ चौगुले
प्रभाग २१ ड : भीमाशंकर म्हेत्रे
प्रभाग २३ क : लक्ष्मण जाधव
प्रभाग २३ ड : अलका राठोड
सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी
प्रभाग क्र. 8 मोहम्मद नकीब हासीब कुरेश
प्रभाग क्र. 17 क बिस्मिल्ला शिकलकर
प्रभाग क्र. 23 अ सुनिता दादाराव रोटे
प्रभाग 26 अ मझून नागिणी प्रवीण इरकशेट्टी
प्रभाग क्र. 18 अंबादास सोमण्णा नडगीरे
काँग्रेसची पहिली यादी
प्रभाग ९ (अ) दत्तू नागप्पा बंदपट्टे
प्रभाग ११ (ड): धोंडप्पा तोरणगी,
प्रभाग ११ (ब): सबा परवीन आरिफ शेख
प्रभाग १४ (ब) शोएब अनिसूर रेहमान महागामी (ड) बागवान खलिफा नसीम अहमद बशीर अहमद,
प्रभाग १५ (क): चेतन नरोटे,(ड) मनीष व्यवहारे,
प्रभाग १६ (ब): फिरदोस पटेल, (क) सीमा यलगुलवार, (ड) नरसिंग कोळी, प्रभाग १७ (अ): शुभांगी लिंगराज, (ब) परशुराम सतारेवाले, (ड) वहीद अब्दुल गफूर बिजापुरे,
प्रभाग २० (अ): अनुराधा सुधाकर काटकर,
प्रभाग २१ (अ) प्रतीक्षा प्रवीण निकाळजे, (क) किरण शीतलकुमार टेकाळे, (ड) रियाज हुंडेकरी,
प्रभाग २२ (अ) संजय हेमगड्डी, (क) राजनंदा डोंगरे, प्रभाग २३ (ब) दीपाली शहा.
दरम्यान सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या वाटास 45 जागा आल्या आहेत.आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 20, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 30 तर माकपला 8 जागा सोडण्यात आल्या होत्या.
