TRENDING:

'मुलीची काळजी घे', सोलापुरात वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाने संपवलं जीवन, पत्नीच ठरली कारणीभूत

Last Updated:

Solapur News: सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे.
News18
News18
advertisement

प्रेम अंकुश जाधव (रा. तळे हिप्परगा, सोलापूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना दोन महिन्यांपूर्वी त्याला मुलगी झाली. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेली होती. मात्र, दोन महिने उलटूनही पत्नी पुन्हा नांदायला येण्यास तयार नव्हती, यामुळे प्रेम प्रचंड मानसिक तणावाखाली होता.

शिमगा सणाला पत्नीला बोलावलं, पण...

advertisement

होळी आणि शिमगा सणाचे औचित्य साधून प्रेमने आपल्या पत्नीला घरी परत येण्यासाठी अनेकदा विनवणी केली होती. मात्र, तिने नांदायला येण्यास नकार दिला. यामुळे तो खचून गेला होता. याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं.

हृदय पिळवटून टाकणारा 'तो' शेवटचा व्हिडिओ

आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने मोबाईलवर व्हिडिओ शूट केला. गळफास घेण्याच्या तयारीत असताना त्याने आपल्या चिमुकल्या मुलीचा उल्लेख करत पत्नीला उद्देशून "माझ्या मुलीची काळजी घे" असं म्हटलं. यासोबतच त्याने पत्नीला एक ऑडिओ संदेश पाठवून आपली व्यथा मांडली आणि मृत्यूला कवटाळले.

advertisement

भावाचा वाचवण्याचा प्रयत्न ठरला अपयशी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंद असावा तर असा, प्रभाकर यांनी दुर्मिळ नाण्यांचा केला संग्रह, काय आहे खास?
सर्व पहा

मध्यरात्रीच्या वेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या प्रेमच्या भावाला काहीतरी आवाज आल्याने त्याने धावत जाऊन पाहिले. प्रेमला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्याने तातडीने खाली उतरवले आणि उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल रुग्णालय पोलीस चौकीत करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मुलीची काळजी घे', सोलापुरात वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाने संपवलं जीवन, पत्नीच ठरली कारणीभूत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल