प्रभाकर बुरांडे हे शहरातील सातारा परिसरामध्ये राहतात. त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारची नाणी गोळा करण्याचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत भरपूर अशी नाणी गोळा केलेली आहेत. यामध्ये त्यांच्याकडे शिवकालीन नाणी, तसेच निजामकालीन आणि एकाना, चाराने, आठना अशी सर्व प्रकारची नाणी त्यांच्याकडे आहेत. त्यासोबतच आरबीआय काही नाणी काढत असते, म्हणजे काही विशिष्ट नाणी आरबीआय हे पब्लिश करत असते, तर त्यापैकी पण काही नाणी त्यांनी संग्रहित केलेली आहेत. ही नाणी सर्वांकडे नसतात, आपण ती विकत घेऊ शकतो, त्यापैकीच त्यांनीही नाणी त्यांच्याकडे संग्रहासाठी ठेवलेली आहेत.
advertisement
Farmer Success: नोकरी परवडेना, शिक्षकानं थेट राजीनामा दिला अन् शेत गाठलं, 65 दिवसांत मालामाल
या नाण्यांबरोबर त्यांच्याकडे अनेक अशा नोटा देखील आहेत, म्हणजे यामध्ये भारतातल्या सर्व ज्या नोटा आहेत त्या देखील आहेत. आणि बाहेर देशातील काही नोटा देखील त्यांच्याकडे आहेत. यामध्ये नेपाळ, दुबई, थायलंड अशा देशातील देखील नोटा त्यांनी गोळा केलेल्या आहेत. त्यांनी ही नाणी अशीच कुठून कुठून गोळा केलेली आहेत, म्हणजे त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी त्यांना काही दिलेले आहेत किंवा इतरही काही ओळखीतल्या लोकांनी त्यांना ही सर्व नाणी संग्रहासाठी दिलेली आहेत. अशाप्रकारे त्यांच्याकडे भरपूर अशी नाणी आहेत.
भविष्यामध्ये हा जो नाण्यांचा संग्रह आहे, त्यांना तो वाढवायचा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना तो दाखवायचा आहे. जेणेकरून जी लहान मुलं आहेत, कधी तरुण आहेत, त्यांना नाणी कशी होती किंवा कुठ कुठल्या प्रकारची नाणी आपल्याकडे आहेत हे सर्व दाखवायचं आहे, असं प्रभाकर बुरांडे यांनी सांगितले आहे.





