advertisement

रिक्षाचालक तिला घरी सोडायला गेला, पतीला संशय आला, छ. संभाजीनगरात मध्यरात्री राडा, काय घडलं?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: ‘माझ्या पत्नीला का घेऊन फिरतोस? तुझा तिच्याशी काय संबंध?’ असा जाब विचारत रिक्षा चालकासोबत वाद घातला.

पत्नीबाबत संशय; रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला
पत्नीबाबत संशय; रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला
छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासी सोडण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर एकाने हल्ला केला. ‘माझ्या पत्नीला का घेऊन फिरतोस?’, असा सवाल करत हल्ला केल्याची घटना सिडको उड्डाणपुलाजवळील दिपाली हॉटेल परिसरात घडली. 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सागर मुळे (रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी सय्यद इस्माईल सय्यद सलीम (वय 31, रा. जाधववाडी, आंबेडकरनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या रिक्षातून एका महिला प्रवाशाला जयभवानीनगर येथून सिडको परिसरातील दिपाली हॉटेलजवळ सोडण्यासाठी आले होते. महिला रिक्षातून उतरताच तेथे उपस्थित असलेल्या सागर मुळे याने ‘माझ्या पत्नीला का घेऊन फिरतोस? तुझा तिच्याशी काय संबंध?’ असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली.
advertisement
वाद चिघळताच सागर मुळे याने रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून रिक्षाचालकाच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्याचवेळी अन्य एका व्यक्तीनेही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर जखमी रिक्षाचालकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हवालदार धारबळे करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रिक्षाचालक तिला घरी सोडायला गेला, पतीला संशय आला, छ. संभाजीनगरात मध्यरात्री राडा, काय घडलं?
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement