आफताब इसाक शेख (वय- कुंभारवाडी, लातूर), यशराज उत्तम कांबळे (वय- इंदिरानगर, लातूर) आणि वैभव गुरुनाथ पांगुळ (वय- कुंभारवाडी, लातूर) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर अयुब सय्यद असं हत्या झालेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे. सोलापूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना लातूर येथून अटक केली आहे.
advertisement
नेमकी घटना काय?
मयत अयुब सय्यद आणि आरोपी आफताब शेख यांची जुनी ओळख होती. अयुब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती आफताबला होती. याच संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी आफताबने त्याचे इतर दोन साथीदार यशराज कांबळे आणि वैभव पांगुळ यांच्या मदतीने हत्येचा कट रचला.
२६ डिसेंबर रोजी रात्री तिन्ही आरोपी अयुब यांच्या उत्तर सदर बझार येथील घरी गेले. तिथे त्यांनी आधी दारूची पार्टी केली. त्यानंतर २६ डिसेंबर रात्री १०:३० ते २७ डिसेंबर दुपारी १:३० च्या दरम्यान उशीने तोंड दाबून अयुब यांची हत्या केली आणि घरातील ऐवज घेऊन दोन दुचाकींवरून पसार झाले.
पोलिसांचा 'फिल्मी' स्टाईल पाठलाग
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपींना पकडण्यासाठी मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला. पोलिसांनी ६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सोलापूर ते लातूर या १३० किलोमीटरच्या महामार्गावरील ६० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले. अवघ्या ६ तासात पोलिसांनी तिघांनाही लातूरमधून ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्तांची माहिती
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी स्पष्ट केले की, ही हत्या केवळ संपत्तीच्या लोभातून झाली असून, याचा कोणत्याही राजकीय कारणाशी संबंध नाही. आरोपींनी चोरलेले दागिने नक्की अस्सल आहेत की नकली, याचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
