घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
या हल्ल्यामध्ये विशेषतः पुणे शहरातून आलेल्या विठ्ठल भक्तांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. अज्ञात तरुणांनी केलेल्या या हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. विठ्ठल मंदिराच्या पवित्र परिसरात वारकऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
advertisement
भाविकांनी पंढरपुरात यायचं की नाही ?
आज पहाटे पावणे पाच वाजता पुणे येथील जेष्ठ नागरिक संघाचा आमचा ग्रुप आम्ही विठ्ठल दर्शनासाठी मंदिरा परिसरात होतो. यावेळी एक व्यक्ती आम्हाला थटून गेली. यानंतर आपण असं का केलं? असा सवाल केला. यावर तरुणांनी मारहाण केली. अशा घटना पंढरपुरात घडत असतील तर भाविकांनी पंढरपुरात यायचं का नाही ? असा सवाल मारहाण झालेल्या भाविकांच्या साथीदारांपैकी दत्तात्रय भंडारी यांनी उपस्थित केला आहे. दत्तात्रय भंडारी पुणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या ग्रुपमधील काही भाविकांना पंढरपुरात मारहाण झाली.