अनिल मारुती नरवडे (वय 57, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सोलापूर-विजापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी तलाव (कंबर तलाव) येथे त्यांनी उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
advertisement
मला माफ कर…
आत्महत्येपूर्वी अनिल नरवडे यांनी आपल्या मोठ्या मुलाला व्हॉट्सॲपवर एक भावनिक संदेश पाठवला होता. या संदेशात त्यांनी आपल्या जुगाराच्या व्यसनामुळे कुटुंबावर आलेल्या संकटाची कबुली देत स्वतःची चूक मान्य केली आहे.
"मी तुमच्या लायकीचा वडील ठरू शकलो नाही… माझ्या वाईट सवयींमुळे हे सर्व घडले… तुम्ही माझा मार्ग कधीच धरू नका…" अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. तसेच, कुटुंबाची जबाबदारी मुलावर सोपवून आई आणि भावाची काळजी घेण्याची शेवटची विनंतीही त्यांनी केली.
गाडी गहाण ठेवल्याची माहिती
या संदेशात त्यांनी जुगारासाठी गाडी गहाण ठेवल्याचेही नमूद केले असून, ती सोडवण्याची जबाबदारी मुलावर सोपवली आहे. आपल्या चुकीमुळे कुटुंबावर ओझे टाकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
व्हायरल मेसेजने शहरात हळहळ
अनिल नरवडे यांचा हा शेवटचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा संदेश वाचून सोलापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी जुगाराच्या व्यसनाविरोधात चिंता व्यक्त केली आहे.
