मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारनं मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा केली अन् मुंबईत वादाला तोंड फुटलं. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बिहार भवनला कडाडून विरोध केला आहे, मनसे आणि शिवसेनेच्या या विरोधानंतर बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी थेट राज ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे. चौधरी यांनी जहरी भाषेत राज ठाकरेंवर टीका केली आहे. चौधरींच्या टीकेला मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ज्या बिहार भवनावरुन हा वाद सुरु झाला आहे.
advertisement
बिहार भवनवरुन वादाला तोंड फुटलं
दक्षिण मुंबईतील एल्फिन्स्टन इस्टेटमधील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर हे बिहार भवन बांधण्यात येणार आहे. 30 मजली उंच इमारतीसाठी नितीश कुमार सरकारनं 314.20 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाची मान्यता दिलीय...त्यात एकूण 178 खोल्या असतील. त्या सरकारी अधिकारी, पाहुणे व गरजू नागरिकांना राहण्यासाठी वापरल्या जातील. बिहारमधील रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत राहण्याची सोय व्हावी यासाठी 240 खाटांचे एक खास वसतिगृहही बांधण्यात येणार आहे. बिहार भवनवरुन मनसे आणि बिहारी नेत्यांमध्ये जुंपलेल्या वादाचे पडसाद राजकीय वर्तुळातही दिसून आले.
बिहारी माणूस या ठिकाणी येऊन पोट भरतो: गुलाबराव पाटील
महाराष्ट्रात नोकऱ्या भरपूर आहेत पण मराठी मुलांची मानसिकता नाही नोकरी करण्याची असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. एवढ्यावरच ते थांबले नाही तर मुलांना राग आला तरी चालेल निवडणुकांना अजून वेळ आहे असं व्यासपीठावरून बोलले. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय आहे. सध्याच्या तरुणांना काम आहे कोण म्हणत काम नाही.काम करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये नाही, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. तर तरुणांना राग आला तर आला आता चार वर्षानंतर निवडणूका आहेत तेव्हा बघू, असं म्हणत तरुण वर्गावर टीका केलीय. दरम्यान बिहारी माणूस या ठिकाणी पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका कशाला करतो असा सवाल देखील गुलाबराव पाटलांनी विचारला आहे. निवडणुक सूरु असताना गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
