TRENDING:

ST Workers: खटाखट...खटाखट...८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर सोमवारी होणार पैशांचा पाऊस, थकित वेतनाचा मार्ग मोकळा

Last Updated:

ST Workers Salary Issue : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन वाढीच्या थकबाकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे,

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन वाढीच्या थकबाकीचा मार्ग आता मोकळा झाला असून, राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे येत्या सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतनाचे थकीत हप्ते जमा होणार आहेत.
खटाखट...खटाखट...८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर सोमवारी होणार पैशांचा पाऊस,  सरकारच्या एका निर्णयानं गुड न्यू
खटाखट...खटाखट...८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर सोमवारी होणार पैशांचा पाऊस, सरकारच्या एका निर्णयानं गुड न्यू
advertisement

सरकारचा निर्णय आणि निधीची उपलब्धता

एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे एकूण ३२५ कोटींची मागणी केली होती. त्यापैकी १०० कोटींचा निधी तातडीने देण्याचा शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा केला होता. उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

advertisement

आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन

थकीत वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, सरकारने निधी जाहीर केल्यामुळे आता हे आंदोलन मागे घेण्याची विनंती महामंडळाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार, थकीत वेतनवाढ समान टप्प्यात देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल मानले जात आहे.

advertisement

कधी येणार पैसे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी प्राप्त होताच सोमवारपर्यंत सर्व वाढीव वेतनाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. फेब्रुवारी महिन्याच्या पगारात हा थकीत हप्ता न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती, जी आता दूर होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Workers: खटाखट...खटाखट...८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर सोमवारी होणार पैशांचा पाऊस, थकित वेतनाचा मार्ग मोकळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल