गेले ३० ते ३५ वर्षे रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठ पुराव्यामुळेच महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील ५०८ रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते. यावेळी काही तांत्रिक त्रुटीमुळे के.एम.टी.तील १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
advertisement
उपमुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी
अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी होईन के.एम.टी.चे रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. या निर्णयामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. यापूर्वी केएमटीकडील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबतही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय दिला होता.
केएमटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी प्रामाणिक प्रयत्न केले
गेली ३५ वर्षे सेवा करूनही नोकरीत कायम होत नसल्याची खंत रोजंदारी कर्मचाऱ्यांना होती. त्यांना इतक्या वर्षात कोणीच न्याय दिला नाही. परंतु, माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.
शासनाच्या निर्णयामुळे १५६ कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू
शासनाच्या निर्णयामुळे १५६ कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चितच सुधारणार असून, घेतलेल्या निर्णयाबाबत क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
