TRENDING:

Supreme Court : फक्त हिंदू,बौद्ध नाहीतर..,SC दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Last Updated:

Scheduled Castes : अनुसूचित जातीच्या दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा आणि स्पष्ट असा निर्णय दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : अनुसूचित जातीच्या दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट असा निर्णय दिला आहे. केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केले, तर त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा तत्काळ आणि पूर्णपणे संपुष्टात येतो. असे न्यायालयाने स्पष्ट केले.या निर्णयाद्वारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निकालही कायम ठेवण्यात आला.
Scheduled Castes
Scheduled Castes
advertisement

निकालात काय उल्लेख?

न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयात असेही नमूद करण्यात आले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करता येणार नाही.

अपीलावर सुनावणी

हा निकाल विथाडा आनंद या धर्मगुरूंनी दाखल केलेल्या अपीलावर देण्यात आला. त्यांनी २०२५ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते. आनंद यांनी अक्काला रामिरेड्डी आणि इतरांविरुद्ध जातीय भेदभाव व अपमान केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी एफआयआरही नोंदवला होता.

advertisement

यानंतर रामिरेड्डी यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आनंद यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे त्यांचा अनुसूचित जातीचा दर्जा संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांना संबंधित कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करता येणार नाही. परिणामी, उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द केला.

सर्वोच्च न्यायालयाचा ठोस निर्णय

या निर्णयाविरोधात आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत त्याला दुजोरा दिला.

advertisement

न्यायालयाने स्पष्ट केले की,१९५० च्या राष्ट्रपती आदेशातील कलम ३ नुसार, अनुसूचित जातीचा दर्जा फक्त ठराविक धर्मांपुरताच मर्यादित आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही धर्मात धर्मांतर केल्यास संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप रद्द होतो.

लाभ आणि संरक्षणावर बंदी

न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की,ज्यांना अनुसूचित जातीचा सदस्य म्हणून मान्यता नाही, अशा व्यक्तींना संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्यांतर्गत मिळणारे आरक्षण, सवलती किंवा कायदेशीर संरक्षणाचा दावा करता येणार नाही. ही तरतूद पूर्णतः बंधनकारक असून त्यात कोणताही अपवाद नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, या निर्णयामुळे धर्मांतर आणि अनुसूचित जातीचा दर्जा यासंबंधीचा कायदेशीर दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला आहे. विशेषतः धर्मांतर केल्यानंतर अनुसूचित जातीच्या हक्कांबाबत दावा करता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supreme Court : फक्त हिंदू,बौद्ध नाहीतर..,SC दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल