आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयावर आत्ताच्या सरकारने चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त होते. तसेच सरकारमध्ये असताना तानाजी सावंत यांनी काही कंत्राटांची निविदा काढली होती. आर्थिक तरतूद नसताना देखील या कामाची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित निविदेला स्थगिती दिल्याची चर्चा आहे. त्याचमुळे सावंत कमालीचे नाराज आहेत.
advertisement
तानाजी सावंत ताटकळत फडणवीस यांच्या दारात, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी तानाजी सावंत पूर्णपणे गैरहजर होते. मात्र सोमवारपासून (आज) सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली. पहिल्याच दिवशी त्यांनी कामकाजात सहभाग नोंदवला. विधानसभेचे कामकाज आटोपल्यावर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले.
मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस भाजपच्या इतर मंत्र्यांसोबत बैठकीत व्यस्त होते. सागर बंगल्याच्या प्रवेशद्वारावरच तानाजी सावंत काही वेळ होते. मात्र काही मिनिटांत त्यांना भेट नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हिरमुसलेले सावंत भेटीविना माघारी वळले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भाजपच्या मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण
दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना आज स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सगळ्या मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्नेहभोजन करतील.
स्नेहभोजनसाठी कोण कोण पोहोचले?
अशोक उईके
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
मंगलप्रभात लोढा
अतुल सावे
गणेश नाईक
शिवेंद्र राजे
माधुरी मिसाळ
पंकज भोयर
जयकुमार रावल
नितेश राणे
मेघना बोर्डीकर
गिरीश महाजन
आशिष शेलार
राहुल नार्वेकर
राम शिंदे