अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडांवर लाखो भक्तगण जोडले गेलेले आहेत. आता याच गडाच्या महंतांनी स्वत:वार केल्याची गंभीर घटना समोर आल्यानं मोठा धक्का बसला आहे. सध्या महंत आदिनाथ शास्त्री महाराजांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. मात्र,याचवेळी महाराजांनी स्वत:वर वार का केले याबाबत काही माहिती समोर आली आहे. अलीकडे नेहमीच संत-महंतांना त्रास दिला जात आहे. बाबांनी असं कराया नको होतंय बाबांना त्रास देणारा जो कोणी नराधम असेल त्याचा शोध घ्यायला हवा. यापूर्वीही अनेक महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. धार्मिक आदरस्थान असलेल्या व्यक्तिमत्त्वांवर त्रास देणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून समाजाने त्याचा बंदोबस्त करायला हवा. आदिनाथ महाराजांच्या प्रकरणात काही संशयित आहेत. त्यांचे सीडीआर काढा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. बाबा कधीच याबाबत बोलणार नाहीत, त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला पकडणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
शस्त्रक्रियेनंतर महाराजांचा अनुयायांना संदेश
बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत म्हणून काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेनंतर काळजीत पडलेल्या भक्तांना स्वतः महाराजांनी संदेश देत दिलासा दिला आहे. माझी तब्येत आता चांगली आहे. कोणीही काळजी करु नका, मी लवकरच गडावर येणार आहे, असा संदेश आदिनाथ शास्त्री महाराजांनी आपल्या भक्तांना दिल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.
आठ दिवस भेटणे टाळावे... डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होते.यावेळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. काळजी करण्याचे कारण नसून भक्तांनी महाराजांना आठ दिवस भेटणे टाळावं जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही असं आवाहन डॉक्टर तन्वर यांनी केलं आहे.
