TRENDING:

Latur: पायावर वळ येईपर्यंत 30 विद्यार्थ्यांना बेदम मारलं, शिक्षकाच्या कृत्याने लातूर हादरलं

Last Updated:

शिक्षक उज्ज्वल सोनी याने शिकवणी वर्गातून विद्यार्थी वसतिगृहाकडे जात असताना त्यांना हटकलं. कारण त्यांची मोटारसायकल सुरू होत नव्हती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशीकांत पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

लातूर : एकेकाळी शिक्षण क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  जिल्ह्यातील अहमदपूरजवळ असलेल्या क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमधील एका शिक्षकाने स्वतःच्या मोटारसायकलची नंबर प्लेट वाकल्याच्या कारणावरून तब्बल ३० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे धक्कादायक घटना पुढे आली आहे. शाळेतून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या हात-पायांवर लाल व्रण आणि सूज स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूरजवळ असलेल्या क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. उज्ज्वल सोनी असं याा शिक्षकाचं नाव आहे.  या शिक्षकाने आपल्या मोटारसायकलची नंबर प्लेट वाकलेली पाहिल्यानंतर संताप अनावर झाला. त्यानंतर  राग शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर काढला.

advertisement

शनिवारी रात्री झालेल्या हा प्रकार शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच शाळेच्या प्राचार्या जेबा नादेर यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षक उज्ज्वल सोनी यांना निलंबित केलं आहे. त्याच्याविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

शनिवारी रात्री शिक्षक उज्ज्वल सोनी याने शिकवणी वर्गातून विद्यार्थी वसतिगृहाकडे जात असताना त्यांना हटकलं. कारण त्यांची मोटारसायकल सुरू होत नव्हती. यावेळी नंबर प्लेट वाकलेली दिसल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना ‘हे कोणी केलं?’ असा प्रश्न विचारला. कोणीही उत्तर दिले नाही, त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी विद्यार्थ्यांना काठीने मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाला सांगितलं आहे. तसंच याप्रकरणी संबंधित शिक्षकाची सेवा तत्काळ समाप्त केली. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात दिले असल्याचे मुख्याध्यापिका नादेर यांनी स्पष्ट केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur: पायावर वळ येईपर्यंत 30 विद्यार्थ्यांना बेदम मारलं, शिक्षकाच्या कृत्याने लातूर हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल