मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील जळका फाट्याजवळ हा अपघात घडला. रात्री उशिरा ही घटना घडली.
चंद्रपूर-यवतमाळला बसला हाी भीषण अपघात झाला आहे. चंद्रपूर-वणीवरून यवतमाळकडे येणाऱ्या बसला करंजीकडून वणीकडे जाणाऱ्या ट्रकची जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्याने एसटी बसच्या ड्रायव्हरच्या बाजूने एसटी बस पूर्ण चिरत गेली. एसटी बसचा ड्रायव्हरच्या बाजूचा भाग हा पूर्णपणे कापला गेला. ड्रायव्हरची केबिन तर जागेवरच नव्हती. यावेळी खिडकीजवळ बसलेल्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 10 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी पांढरकवडा येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
