ठाणे महापालिकेची पहिलीच महासभा सोमवारी संपन्न झाली. या महासभेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी हजेरी लावली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना शिवसेना जाणून बुजून बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी सभेतून वॉकआऊट केले.
भाजपने केले महासभेतून वॉकआऊट, ठाणे महापालिकेत सेना-भाजपमध्ये खडाजंगी
पहिल्याच महासभेत भाजप शिवसेनेत खडाजंगी पाहायला मिळाली. आम्हाला बोलू दिले जात नाही असे सांगत भाजप महिला नगरसेविकांनी घोषणाबाजी केली. आम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर आम्ही सत्तेबाहेर पडण्यास तयार आहोत, असा थेट इशारा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिला. तसेच त्यांनी महासभेतून वॉकआऊटही केले.
advertisement
पहिल्याच महासभेत भाजप शिवसेनेविरोधात आक्रमक
महासभेच्या सुरुवातीलात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही जनतेला बांधील आहोत. आमच्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळालीच पाहिजेत, असे सांगत भाजपा नगरसेवक शिवसेनेविरोधात आक्रमक झाले होते.
आधी विरोधात बसण्याची भूमिका, नंतर समीकरण जुळल्याने भाजप सत्तेत सहभागी
सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षासोबत महापालिकेत सत्ता स्थापन करणार नाही, असा पवित्रा घेतला. आमचा मानसन्मान ठेवला तर ठीक नाहीतर आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधात बसणे पसंत करू, अशी भूमिका भाजपने घेतली. परंतु नंतर सत्तावाटपाच्या वाटाघाटीत समीकरण जुळल्याने भाजपने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
