पीडित मुलीची आई गर्भवती असताना पोलिसांकडून १० तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं गेलं. यामुळे पीडितेच्या आईला मोठा धक्का बसला. यामुळे तब्येत बिघडली आणि तापही आला. पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलं की, आम्ही एका खासगी रुग्णालयात मुलीची तपासणी केली तेव्हा लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं. त्यानंतर सरकारी रुग्णालयात पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बराच वेळ पोलीस स्टेशनला चौकशी केली.
advertisement
Badlapur Protest : बदलापूर आंदोलनामुळे रेल्वेला मोठा फटका; तासाला कोट्यवधीचं नुकसान, वकिलांचा दावा
वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस चौकशीत बराच वेळ गेला. हा काळ पीडित मुलगी आणि तिच्या आईसाठी खूपच त्रासदायक होता असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केलाय. पोलिसांनी या प्रकरणात संवेदनशिलता दाखवली नाही. लहान मुलीचं प्रकऱण असूनही गुन्हा दाखल करायला वेळ लावला असं नातेवाईकांनी म्हटलंय.
चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण गंभीर असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करायला वेळ का लावला? असा सवाल आंदोलकांनी विचारला. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआर नुसार १६ ऑगस्टला याची माहिती देण्यात आली. एका मुलीच्या पालकांना समजलं की, दुसरी एक मुलगी शाळेत जायला घाबरत आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टला त्रास होत असल्याची तक्रार करत आहे. शाळेत कुणीतरी तिच्यावर अत्याचार केल्याच्या संशयानंतर रुग्णालयात नेलं गेलं. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.