TRENDING:

दोरीने हात बांधून 2 मुलांना मारहाण, डोंबिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक प्रकार

Last Updated:

Crime in Dombivli: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं दोन लहान मुलांना त्यांचे हात दोरीने बांधून मारहाण करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं दोन लहान मुलांना त्यांचे हात दोरीने बांधून मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण संबंधित सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलांच्या कुटुंबीयांनी याबाबत जाब विचारला असता आरोपी सुरक्षा रक्षकाने त्यांच्याशी देखील आरेरावी करण्याचा प्रयत्न केला.
News18
News18
advertisement

याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत एक सुरक्षा रक्षक आणि दोन मुलांचे हात बांधल्याचं दिसत आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून आरोपी सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

advertisement

राजेंद्र खंदारे असं अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. तो डोंबिवली येथील 'पलावा कासा बेला गोल्ड' या हाय प्रोफाईल सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अशा प्रकारे उच्चभ्रू सोसायटीत दोन मुलांना मारहाण केल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पलावा सिटीतल्या कासा बेला गोल्ड सोसायटीत बुधवारी संध्याकाळी काही लहान मुले हॉलीबॉल खेळत होती. खेळादरम्यान बॉल शेजारच्या इमारतीत गेला. बॉल आणण्यासाठी मुलं गेली असता त्या इमारतीचा सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याने मुलांना पकडलं आणि “तुमच्यामुळे गाड्यांचं नुकसान होतंय!” अशा शब्दांत तो मुलांवर ओरडला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

आरोपी खंदारे एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने चक्क दोन्ही मुलांना पकडून त्यांचे हात बांधले आणि बेदम मारहाण केली. ही बाब जेव्हा मुलांच्या पालकाच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षकाला जाब विचारला असता या संतप्त सुरक्षा रक्षकाने पालकांना ही अरेरावी करत “मी कोणाला घाबरत नाही, जे करायचं ते करा!" असे सांगत त्यांना सोसायटी मधून बाहेर काढले. या प्रकरणानंतर मुलांच्या पालकांनी तत्काळ मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ही घटना स्थळी धाव घेत राजेंद्र खंदारे याला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
दोरीने हात बांधून 2 मुलांना मारहाण, डोंबिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल