TRENDING:

आईने कमावलेल्या मालमत्तेवर आता..,उच्च न्यायालयाचा दणका, दिला मोठा निर्णय!

Last Updated:

Property Rules : पालक आणि अपत्यांमधील मालमत्तेच्या वादांवर देशभरात सातत्याने चर्चा होत असते. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणात ओडिसा उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयामुळे कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पालक आणि अपत्यांमधील मालमत्तेच्या वादांवर देशभरात सातत्याने चर्चा होत असते. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणात ओडिसा उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयामुळे कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आईची इच्छा नसल्यास तिच्या स्वतःच्या मालकीच्या घरात मुलाला राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे पालकांचे मालमत्ता अधिकार आणि मुलांचे दावे यावर नव्याने प्रकाश टाकला गेला आहे.
Property Rules
Property Rules
advertisement

नेमके काय आहे हे प्रकरण?

मालमत्तेच्या कारणावरून कुटुंबांत वाद होणे ही बाब नवीन नाही. विशेषतः वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित मालमत्तेतील फरक नीट न समजल्यामुळे अनेकदा न्यायालयीन लढाया उभ्या राहतात. ओडिशातील भुवनेश्वर येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या मुला आणि सुनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. काबाडकष्ट करून उभारलेल्या घरातच आपल्याला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप तिने केला होता.

advertisement

वृद्ध महिलेचा दावा काय होता?

या महिलेनुसार, मुलगा आणि सून सतत वाद घालत असून त्यांनी तिला घरात शांततेने राहू दिले नाही. परिस्थिती इतकी बिघडली की, स्वतःच्या घरातून बाहेर पडून तिला भाड्याच्या घरात राहावे लागले. हा वाद मिटवण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर बैठका, तसेच पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. उलट मुलगा आणि सुनेने घरावर आपलाच हक्क असल्याचा दावा केला.

advertisement

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणाची सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली. आईच्या नावावर असलेल्या घरात तिच्या इच्छेविरुद्ध मुलगा किंवा सून राहू शकत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयाने नाराज झालेल्या मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सदर मालमत्ता वडिलोपार्जित असल्याचा दावा केला.

उच्च न्यायालयात काय घडले?

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बेहरा यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणीदरम्यान वृद्ध महिलेने मुलगा आणि सुनेमुळे आपल्याला जीवित धोका असल्याची भीती व्यक्त केली. संबंधित घर हे आपल्या पतीने स्वतःच्या पैशांतून खरेदी केले असून ते पूर्णपणे तिच्या नावावर असल्याचे तिने स्पष्ट केले. यासंदर्भातील खरेदीपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली.

advertisement

उच्च न्यायालयाचा ठाम निर्वाळा

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महिलांच्या मालमत्ता अधिकारांवर अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. हिंदू महिलेच्या नावावर असलेली मालमत्ता ही तिची स्वकष्टार्जित मालमत्ता मानली जाते. अशा मालमत्तेवर मुलगा किंवा सून आपोआप हक्क सांगू शकत नाहीत. आईची इच्छा नसताना तिच्या घरात राहण्याचा अधिकार मुलाला नाही, हा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने ठरवले. परिणामी, मुलगा आणि सुनेने तातडीने घर खाली करावे, असा आदेश देण्यात आला.

advertisement

वडिलोपार्जित संपत्तीबाबत कायदा काय सांगतो?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

हिंदू वारसा कायदा (सुधारणा) २००५ नुसार, वडिलोपार्जित संपत्तीवर मुलगा आणि मुलगी दोघांनाही जन्मतःच हक्क असतो. मात्र जी मालमत्ता पालकांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली असते, ती वडिलोपार्जित ठरत नाही. त्यामुळे अशा मालमत्तेवर मुलांना कायदेशीर हक्क मिळत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईने कमावलेल्या मालमत्तेवर आता..,उच्च न्यायालयाचा दणका, दिला मोठा निर्णय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल