मृतक मीरा ईसुलाल तुरकर यांचा लहान मुलगा मुकेश तुरकर यांचे निधन 30 मे 2025 ला आजाराने झाल्याने त्याच्या पिंडदानासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर 20 ते 25 लोक आले होते. दुपारी 12.30 वाजता पूजा करण्यापूर्वी अंघोळीसाठी महिला म घाटावर उतरल्या. मुकेश तुरकरची वहिनी गायत्री राजेश तुरकर या अंघोळ करत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मिनाश्री संतोष बघेले (36) यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघी बुडू लागल्या.
advertisement
एकमेकींना वाचवताना तिघींचा मृत्यू
दोघींना बुडत असतांना पाहून स्मिता शत्रुघन टेंभरे (30 ) यांनी पाण्यात उडी घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या देखील पाण्यात बुडाल्या. तिघांना बुडत असल्याचे पाहून मीरा ईसुलाल तुरकर (55) या त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असतांना या प्रयत्नात त्या स्वतःचा जीव गमावून बसल्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावांडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. सतीश एकनाथ आगळे ( वय 18 वर्षे) , गौरव शिवाजी आगळे (वय 16 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलांचे नावं आहे. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सतीश आगळे व गौरव आगळे हे दोन भाऊ कुटुंबातील व्यक्ती लग्नासाठी बाहेर गावी गेले असता घरी एकटेच असल्याने त्यांनी शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले मासे पकडण्यासाठी ची जाळी फेकली. मात्र या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तरुणाचा पाण्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.