अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू असताना पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबादरम्यान तिचे लग्न कायदेशीर वयापेक्षा कमी असतानाच लावून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच तपास यंत्रणांनी मुलीच्या भविष्याशी खेळणाऱ्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींवर कारवाईचा बडगा उगारला आला आहे.
सरपंच आणि ग्रामसेवकावर कडक कारवाई
बालविवाह हा कायद्याने गुन्हा असतानाही गावात हा विवाह पार पडलाच कसा, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या विवाहाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्या गावचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कडक कारवाई केली जाणार आहे. शासनाच्या जबाबदार पदावर असताना बालविवाह रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
advertisement
पॉक्सो दाखल होण्याची शक्यता
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पीडितेचा विवाह झाला तेव्हा ती अल्पवयीन असल्याने तिच्या पतीवर आता 'पोक्सो' सारखा अतिशय गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो. बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बालविवाह लावणाऱ्या आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. पीडित विवाहिता रात्री आपल्या घरात झोपलेली होती. रात्री गरम होत असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता, मध्यरात्री सगळे गाठ झोपल्यानंतर आरोपी वैभव पटेकर याने पीडितेला बळजबरीने उचलून गावाबाहेर नेले. तिथे एका निर्जन स्थळी नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. एवढ्यावरच या नराधमाचा राक्षसीपणा थांबला नाही, तर त्याने पीडितेचा मानसिक छळ करण्यासाठी तिला पुन्हा गावात आणले आणि गावच्या सार्वजनिक चावडीवर असलेल्या खांबाला दोरीने बांधून ठेवले. आरोपी पीडितेला घरातून उचलून नदीकडे घेऊन गेला. त्यावेळी पीडित महिलेना आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर आरोपीने तोंड दाबले होते. नदीवर आरोपीने महिलेवर अत्याचार केले आणि त्यानंतर बेशुद्ध झालेल्या पीडितेला गावच्या चौकात बांधून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
