एक धक्कादायक घटना धुळ्यातून समोर आलीय. धुळे जिल्ह्यातील कुसुंबा मालेगाव मार्गावरती भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. या भीषण अपघाताचे फोटो सध्या समोर आले आहेत.
advertisement
राजस्थानहून हैद्राबाद जाणाऱ्या खाजगी ट्रव्हल बसचा अपघात झाला असून या भयंकर अपघातात काहींचा मृत्यू झालाय तर काही गंभीर जखमी आहेत.
खाजगी लक्झरी पलटल्याने दोन जणांचा मृत्यू तर 26 जण जखमी झालेत. मयातांमध्ये महिलेसह लहान बालकाचा मृत्यू झालाय.
advertisement
खंडेरावच्या बारी जवळ ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली.
advertisement
अपघात झाल्याचं समजताच जखमींना तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2024 5:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वळणावर घात झाला, भर उन्हात ट्रॅव्हल बस पलटली, 2 जणांचा मृत्यू, घटनास्थळाचे PHOTOS