TRENDING:

Accident: ...आणि उड्डाण पुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; नगरचा थरकाप उडवणारा VIDEO

Last Updated:

अहमदरनगर शहरातील उड्डाणपूलावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. आज एक आयशर ट्रक थेट पूलावरून खाली कोसळला....

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर: 
News18
News18
advertisement

अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर अपघाताची मालिक सुरूच आहे. या पुलावरून आयशर ट्रक पुलावरील जाळ्या तोडून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नगरमधील या धोकादायक ठऱलेल्या नव्या उड्डाण पूलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मोठा अनर्थ टळला: 

अत्यंत वर्दळीच्या रोडवर असलेल्या अहमदनगर सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे. याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी वाहने या उड्डाणपूलावरून खाली पडली आहेत. ज्या ठिकाणी वळण आहे, त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चार चाकी खाली कोसळत आहेत. त्यामुळे हे वळण चुकीचे असल्याचं सातत्याने बोललं जात आहे. या कामात अभियंत्याकडून तांत्रिक चूका झाल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

advertisement

अपघात थांबणार कधी?

अहमदनगर - सोलापूर चौकातील उड्डाण पूलावरील हे वळण धोकादायक असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे. या पुलाच्या तांत्रिक डिझाईनमध्ये काही चुका झाल्याने या वळणावरून वाहने खाली कोसळत असतात. शिवाय या रस्त्यावर मोठी रहदारी असते, अशा वेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित अभियंत्याला सूचना करून पुलाच्या रचनेत योग्य ते बदल करावते अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. आता या मागणीला तात्काळ प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

दरम्यान राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन नगर शहरात आणखी काही रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्याच्या तयारीत आहे. अशाने एक ना धड भाराभर चिंध्या अशी पुलांची अवस्था होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident: ...आणि उड्डाण पुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; नगरचा थरकाप उडवणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल