मुंबईतला पाऊस आणि अरबी समुद्राची भरती ओहोटी यावर विसर्जन अवलंबून असते. आम्ही बरोबर ८ वाजता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आलो होतो. परंतु अरबी समुद्राला भरती लवकरच आली होती. आम्ही इथं पोहोचायच्या अगोदर भरती आली होती, त्यामुळे विसर्जन लांबल्याचे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचा सुधीर साळवी यांना फोन
advertisement
विसर्जन विलंबाच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना फोन करून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आज दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी संदर्भात चर्चा केली. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचेही आवाहन केले.
एकनाथ शिंदे यांचा सुधीर साळवी यांना फोन
उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर काही वेळातच सुधीर साळवी यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन केला. शिंदे यांनीही फोन करून विलंब कारणांची विचारपूस केली. आज दिवसभर लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळ्यात अनेक अडचणी आल्या होत्या. या सर्व अडचणींवर मंडळाने यशश्वीपणे मात करत अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन मार्गस्थ केले. या सर्व भावनिक क्षणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाच्या मंडळासोबत असल्याचे सांगत सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.