TRENDING:

दोघींनी तरुणीला हाक दिली; घराबाहेर येताच 2 तरुणांनी चाकूने कापला गळा, वर्ध्यात खळबळ

Last Updated:

दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला सांगितलं. ही तरुणी रात्री घराबाहेर अंगणात येताच तिथे असलेल्या युवकांनी चाकूने तिच्या गळ्यावर वार केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेंद्र मते, वर्धा 03 ऑक्टोबर : राज्यात दररोज हत्येच्या अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटना हादरवून टाकणाऱ्या असतात. अशीच एक घटना आता वर्ध्यातून समोर आली आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवतीची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिला घरातून बाहेर बोलावून तिची हत्या केली. या थरारक घटनेनं दहेगाव गोसावी येथे तणावाचं वातावरण आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? हे अद्याप समजू शकलेलं नाही.
दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले
दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले
advertisement

एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. वर्ध्याच्या नालवाडी येथील दोन तरुण दहेगाव गोसावी येथे पोहचले. त्यांनी सोबत असलेल्या दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला सांगितलं. ही तरुणी रात्री घराबाहेर अंगणात येताच तिथे असलेल्या युवकांनी चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

advertisement

'अहो चॉकलेट आणा ना', बायकोचा फोन आणि पुढच्याच क्षणी नवऱ्याचा मृत्यू; असं काय घडलं?

अंकिता सतीश बाईलबोडे असं मृत्यू झालेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करत पकडलं आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दहेगाव गोसावी येथे घडलेल्या या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण आहे. दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले होते.

advertisement

या थरारक घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडलं होतं. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ माजली होती. अशातच आता ही आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, त्यामुळे, आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
दोघींनी तरुणीला हाक दिली; घराबाहेर येताच 2 तरुणांनी चाकूने कापला गळा, वर्ध्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल