TRENDING:

'ती' घरी येताच बेदम मारहाण, अंगावरचे कपडेही काढून घेतले, नगरमध्ये कीर्तनकाराचं संतापजनक कृत्य, FIR मध्ये नक्की काय म्हटलं?

Last Updated:

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर: पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका कीर्तनकार महाराजाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी मागील पाच वर्षांपासून पीडितेचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी तिला सातत्याने धमकावत होता. घरी कुणी नसताना संधी साधून तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर तिच्या भावाने विश्वासात घेत याबाबत विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराजाचा मुलीवर अत्याचार
यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराजाचा मुलीवर अत्याचार
advertisement

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज असं आरोपीचं नाव आहे. तो श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे. मागील पाच वर्षांपासून तो १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धाक दाखवून अत्याचार करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असताना आरोपीनं तिच्यावर वाईट नजर ठेवून संधी साधली. तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. विरोध केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तो मुलीला गप्प बसवत होता. १० मार्च रोजी आरोपीने मुलीला घरी बोलावून मारहाण करत गरम लोखंडी पक्कडीने चटके देत पुन्हा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

advertisement

१४ मार्च रोजी पीडितेने हा प्रकार भावाला सांगितल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून रविवारी पहाटे चार वाजता आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

advertisement

एफआयआरमध्ये नक्की काय म्हटलं?

घटनेच्या दिवशी १० मार्च रोजी आरोपीनं पीडितेला फोन करून घरी भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी पीडित मुलीने आरोपीकडे जाण्यास नकार दिला होता. यामुळे आरोपीचा संताप अनावर झाला. त्याने पीडितेच्या वडिलांना आणि भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली. यावेळी संतापलेल्या आरोपीनं तिला गालावर चापटी आणि अंगावर बांबूने मारहाण केली, असं तक्रारीत म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. आरोपीनं तिचे अंगावरील सगळे कपडे काढून घेतले आणि किचनमध्ये गेला. त्याने गॅसवर पक्कड गरम करून आणली आणि मुलीच्या गुप्तांगाजवळ दोन्ही मांड्यांना चटके दिले. यावेळी मुलीने विरोध केला असता आरोपीनं तिच्या हातालाही चटके दिले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणी आपल्या घराजवळ रडत बसली होती. ही बाब भावाने पाहिली, त्याने पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बहिणीसोबत घडणारा प्रकार ऐकून भावाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'ती' घरी येताच बेदम मारहाण, अंगावरचे कपडेही काढून घेतले, नगरमध्ये कीर्तनकाराचं संतापजनक कृत्य, FIR मध्ये नक्की काय म्हटलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल