TRENDING:

सावधान! यंदाची होळी ठरणार सर्वात 'हॉट'; सूर्य ओकणार आग, हवामान खात्याचा धडकी भरवणारा इशारा

Last Updated:

मुंबईसह महाराष्ट्रात थंडी संपली असून स्कायमेटने वेळेआधी उन्हाळ्याचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात तापमान ३६ अंशांवर, पिकांवर परिणाम होण्याची भीती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: थंडी गायब झाली असून आता उन्हाचा तीव्र झळा जाणवायला लागल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीनं झोडपल्यानंतर आता उन्हाचे चटकेही तीव्र बसणार आहेत. यंदा वेळेआधीच उन्हाळा येण्याचे संकेत स्कायमेटने वर्तवले आहेत. राज्यातून आता थंडीने पूर्णपणे गायब झाली असून, प्री-मान्सून हंगामात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांत दिसणारे ढगाळ वातावरण आता निवळणार असून, उन्हाचा कडाका भयंकर वाढण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

उन्हाळा येतोय वेळेआधीच!

पूर्वी मार्च महिन्यात निसर्ग बहरलेला असायचा आणि हवामान सुखावह असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. मार्च महिना सुरू होताच कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, मार्चच्या उत्तरार्धात राजस्थान आणि मध्य भारतामध्ये तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचते, ज्याचे थेट चटके महाराष्ट्रालाही बसतात. यामुळे रब्बी पिकांच्या काढणीवर आणि गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

advertisement

विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पाऊस किंवा अवकाळीची कोणतीही शक्यता नाही. हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून तापमानात झपाट्याने वाढ होईल. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आता आर्द्रता वाढणार आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही काळ धुळीचे प्रमाण वाढू शकते, मात्र पाऊस पडणार नाही. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली या भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसले तरी पावसाची शक्यता धुसर आहे.

advertisement

उत्तर भारताचा परिणाम महाराष्ट्रावर कसा?

येत्या २ मार्च रोजी उत्तर भारतात एक नवीन 'वेस्टर्न डिस्टरबन्स' (पश्चिमी विक्षोभ) दाखल होत आहे. यामुळे ३ आणि ४ मार्चला जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होईल. या बदलामुळे उत्तरेकडून येणारे वारे वेगवान होतील. याचा परिणाम म्हणून पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत धुळीची वादळं सुटतील. महाराष्ट्रात जरी याचा थेट पाऊस पडणार नसला, तरी वाऱ्यांच्या या बदलामुळे हवेतील धुलिकण वाढून मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील प्रदूषणावर परिणाम होऊ शकतो.

advertisement

धूळ आणि वादळाची शक्यता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमानामुळे जमिनीवर 'लो प्रेशर' (कमी दाबाचा पट्टा) तयार होतो. त्यात जर समुद्राकडून बाष्प आले, तर अचानक धुळीची वादळं आणि गारपीट होण्याची शक्यता असते. सध्या तरी पुढील ४-५ दिवस हवामान स्वच्छ राहील, पण जसे तापमान ४० अंशांच्या जवळ जाईल, तसे वादळाचा धोका वाढू शकतो. अशा वेळी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हवामान खात्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावधान! यंदाची होळी ठरणार सर्वात 'हॉट'; सूर्य ओकणार आग, हवामान खात्याचा धडकी भरवणारा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल