TRENDING:

Nashik Crime: क्रेडिट कार्डवरून लोन घेताय? जवळच्या स्त्रियांचा होऊ शकतो छळ! इगतपुरीत कर्जवसुलीसाठी अश्लील कॉलचा प्रकार

Last Updated:

Nashik Crime: कॉल सेंटरमधील कर्मचारी बँकेकडील बनावट ओळख दाखवून अश्लील कॉल करून कर्जवसुलीचे प्रयत्न करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिकजवळील इगतपुरीमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. या कॉल सेंटरमधून कर्जवसुलीच्या नावाखाली कर्जदारांच्या संपर्कातील महिलांना अश्लील कॉल करून पैसे वसुलीसाठी धमकावण्याचा प्रकार सुरू होता. छत्रपती संभाजीनगरमधील एका महिला वकिलाच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत कारवाई केली.
Nashik Crime: क्रेडिट कार्डवरून लोन घेताय? जवळच्या स्त्रियांचा होऊ शकतो छळ! इगतपुरीत कर्जवसुलीसाठी अश्लील कॉलचा प्रकार
Nashik Crime: क्रेडिट कार्डवरून लोन घेताय? जवळच्या स्त्रियांचा होऊ शकतो छळ! इगतपुरीत कर्जवसुलीसाठी अश्लील कॉलचा प्रकार
advertisement

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कॉल सेंटरचा चालक नरेंद्र शशिकांत भोंडवे (32, रा. इगतपुरी) आणि पारस संजय भिसे (26, रा. घाटकोपर, मुंबई) यांना अटक केली. त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक, शुक्रवारी 14 जिल्ह्यांना अलर्ट

advertisement

काय आहे प्रकरण?

15 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील एका 31 वर्षांच्या महिला वकीलाला एक फोनकॉल आला होता. एका महिलेच्या कर्जाचा संदर्भ देत वकिलाला धमकावण्यात आलं. कर्जदार महिलेशी आपला काहीही संबंध नसल्याचं वकिलाने सांगितलं. तरीही कर्जदार महिलेला कॉल कॉन्फरन्सवर घेऊन कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी वकिलाला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. असाच प्रकार वकिलाच्या परिसरातील अनेक महिलांसोबत देखील घडला. ही बाब लक्षात येताच महिला वकिलाने सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याकडे तक्रार केली. पांढरे यांनी फोन क्रमांकाची माहिती घेतली असता सर्व क्रमांक इगतपुरी येथील असल्याचं समोर आलं. त्यानंतर पांढरे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला.

advertisement

नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासात, इगतपुरीच्या मीनाताई ठाकरे संकुलात क्रेडिट कार्डच्या कर्जवसुलीसाठी अवैधरीत्या कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी लोकेशनवर जाऊन छापा टाकला. याठिकाणाहून दोघांना ताब्यात घेत मोबाइल व सीमकार्ड, असा 24 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इगतपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

advertisement

असं होतं रॅकेटचं स्वरुप

राज्यातील अनेक नामांकित बँका, पतसंस्था कर्जदारांचा छळ करून कर्जवसुलीसाठी अशा बोगस कॉल सेंटरला कंत्राट देतात. क्रेडिट कार्डद्वारे दिलं जाणारं होम लोन आणि अन्य कर्जाची वसुली करण्यासाठी कर्जदार व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सोशल मीडियावरील फ्रेंड्सशी कॉल सेंटरवाले संपर्क साधतात. बँकेकडील बनावट ओळख दाखवत बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून कर्जवसुलीचे प्रयत्न केले जातात. कारवाई झालेल्या कॉल सेंटरमध्ये 40 ते 50 कर्मचारी काम करतात. कॉल सेंटर चालक अवैधरीत्या कर्जखातेदारांचा वैयक्तिक डेटा संकलित करून संपर्क करतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Crime: क्रेडिट कार्डवरून लोन घेताय? जवळच्या स्त्रियांचा होऊ शकतो छळ! इगतपुरीत कर्जवसुलीसाठी अश्लील कॉलचा प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल