TRENDING:

नवरा सोडला, बॉयफ्रेंडलाही केलं चीट, पुण्याच्या तरुणीसोबत जंगलात घडलं भयंकर, 14 दिवसांनी उलगडलं गूढ

Last Updated:

यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १४ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १४ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. एका तरुणीचा अशाप्रकारे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. तरुणीसोबत काय घडलं? तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घात घडला? याची कसलीच माहिती पोलिसांकडे नव्हती. याबाबत विविध तर्क लढवले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर १४ दिवसांनी यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावला आहे. प्रियकरानेच आपल्या अल्पवयीन भावाच्या मदतीने हा निर्घृण खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
यवतमाळच्या जंगलात तरुणीची प्रियकराकडून हत्या
यवतमाळच्या जंगलात तरुणीची प्रियकराकडून हत्या
advertisement

नेमकं प्रकरण काय?

कल्पना (नाव बदललं आहे) (२६) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर सतीश रमेश कश्यप आरोपी प्रियकराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना ही विवाहित होती. मात्र काही काळापासून आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. याच दरम्यान तिची ओळख सतीश रमेश कश्यप याच्याशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सतीशने कल्पनाला उदरनिर्वाहासाठी पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीही लावून दिली होती. मात्र, काही दिवसांनंतर कल्पनाचे पुण्यात दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सतीशला येऊ लागला. या संशयातून सतीशने कल्पनाचा काटा काढण्याचा कट रचला.

advertisement

असा रचला हत्येचा कट

सतीशने कल्पनाला पुण्यातून यवतमाळला बोलावून घेतले. त्यानंतर तिला गोड बोलून जोडमोहा परिसरातील निर्जन अशा तासलोट जंगलात नेले. त्या ठिकाणी सतीशने तिचा गळा आवळून निर्घृण खून केला. हत्येनंतर कल्पनाची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने सतीशने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण कृत्यात सतीशला त्याच्या अल्पवयीन भावानेही साथ दिली.

advertisement

पोलिसांनी असा लावला छडा

तासलोट जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. यासाठी १९६ कॅमेरा फुटेज तपासले. ४० हजाराहून अधिक फोन कॉल्सचा तपास केला. तपासादरम्यान पोलिसांचा संशय सतीश कश्यपवर बळावला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

पोलिसांनी सतीशला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सतीश कश्यपला अटक केली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरा सोडला, बॉयफ्रेंडलाही केलं चीट, पुण्याच्या तरुणीसोबत जंगलात घडलं भयंकर, 14 दिवसांनी उलगडलं गूढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल