दिल्ली : असं म्हणतात की, ‘मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है’, हे पुन्हा एकदा एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील जी मुले असतात, आपली एक कुटुंब असावी आणि पत्नी, मुलांसह एक आनंदी आयुष्य जगता यावं, त्यांचे स्वप्न असते. मात्र, अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. पण एक तरुण असा आहे, ज्याने कमी पगाराची नोकरी असताना एक मोठा निर्णय घेतला आणि आज आपलं एक वेगळं अस्तित्त्व सिद्ध करुन दाखवलं आहे.
advertisement
संजय जयसवाल असे या तरुणाचे नाव आहे. त्यांचा जन्म दिल्लीत एका साधारण कुटुंबात झाला. ते पश्चिम दिल्लीतील सुल्तानपुरी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून खाजगी क्षेत्रात काम केले. याठिकाणी त्यांचा पगार हा 12 ते 13 हजार होता. मात्र, इतक्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते. आधी ते फ्लिपकार्टवरून उत्पादने खरेदी करायचे. मात्र, फ्लिपकार्टवर उत्पादनेही विकता येतात, हे त्यांना माहिती झाले.
या चूका अजिबात करू नका, शनिदेव नक्की प्रसन्न होणार, फक्त कराल हा अचूक उपाय
यानंतर त्यांनी ई-कॉमर्समध्ये करिअर करण्याचा विचार केला. याठिकाणी ते मागील 6 वर्षांपासून आपली पत्नी, आई, भाऊ आणि वडील यांच्यासोबत मिळून फुटवेअरचा व्यवसाय करत आहेत. हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. आधी बसमध्ये धक्के खाऊन नोकरीवर जावे लागायचे. यानंतर त्यांनी स्कूटर खरेदी केली. आता ते आपल्या स्वत:च्या कारने कुठेही जातात. ई-कॉमर्समुळे संपूर्ण भारतात पोहोचल्याने आता बघता बघता त्यांचे नशिब बदलले.
....तर भारतात कथा होऊ देणार नाही, पंडित प्रदीप मिश्रा यांना साधूसंतानीच दिला इशारा, नेमकं काय घडलं?
संजय जयसवाल यांनी सांगितले की, त्यांचा व्यवसाय आता खूप चांगला चालत आहे. चांगली वाढ होत आहे. वर्षाला 4 कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे. प्रत्येक दिवशी जवळपास 600 पर्यंत ऑर्डर मिळतात. आज त्यांचा फुटवेअर ब्रांड क्लॉयसबुर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि पॅन इंडिया यांच्या प्रॉडक्टची डिलिव्हरी होत आहे.