गोड्डा : सध्या अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहेत. सरकारी नोकरी कमी होत असल्याची अनेकांनी तक्रार आहे. तर खासगी क्षेत्रातही चांगली नोकरी मिळत नसल्याची भावना आहे. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊनही अनेक जण बेरोजगार असल्याचे दिसत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही एका तरुणाने हार न मानता एक अनोखा निर्णय घेतला.
या तरुणाने इंजीनिअरींगचे शिक्षण घेतले. मात्र, तरीही त्याला नोकरी मिळाली नाही. पण अशा परिस्थितीतही त्याने हार न मानता एक अनोखा निर्णय घेतला. अजय कुमार साह असे या तरुणाचे नाव आहे. तो पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करत आहे. आज जाणून घेऊयात, त्याच्या प्रवासाची अनोखी कहाणी.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, त्यांनी 2022 GITA Autonomous College भुवनेश्वर, येथून इंजीनिअरींगचे शिक्षण घेतले. यानंतर त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला. याठिकाणी आता तो फक्त 4 ते 5 तासात तब्बल 2 ते 3 हजार रुपयांची कमाई करत आहे.
या लक्षणांना अजिबात हलक्यात घेऊ नका, होऊ शकतो गंभीर आजार, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
10 रुपयाला 4 पाणीपुरी -
सकाळी 9 वाजता तो घरी सामान तयार करायला सुरुवात करतो. वर्षभर तो दोन फ्लेवरची पाणीपुरी विकतो. तर वेगवेगळ्या सीजनच्या फळानुसारही पाणी बनवतो. झारखंडच्या गोड्डा येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तो स्टॉल लावतो. या स्टॉलवर तीन वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाण्याबरोबरच पाणीपुरीचा मसालाही खास आहे. हा मसाला वाटाणा, हरबरे आणि बटाट्यापासून तयार केला जातो. याठिकाणी 10 रुपयाला 4 पाणीपुरी मिळतात.
लोकांचा चांगला प्रतिसाद -
अजय कुमार साह या तरुणाच्या पाणीपुरी स्टॉलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाणीपुरी खायला आलेल्या रामानुजन यांनी सांगितले की, खूप दिवसांपासून ते या स्टॉलवर पाणीपुरी खात येत आहेत. वर्षभरापूर्वी जेव्हा हा स्टॉल भागलपूर रोड याठिकाणी लावला जात होता, तेव्हापासून या स्टॉलवर चविष्ट पाणीपुरी मिळते.
तुम्हीही तुळशीची माळसोबत घालतात रुद्राक्ष?, आताच व्हा सावधान! महत्त्वाची माहिती..
रात्रीपर्यंत याठिकाणी खवय्यांची गर्दी -
याठिकाणी तीन प्रकारची पाणीपुरी दिली जाते. यामध्ये धणे-पुदिन्याचे पाणी, कैरीचे पाणी आणि आंबट-गोड पाणी ग्राहकांना खूप आवडत आहे. सायंकाळी 4 वाजता हा स्टॉल लावला जातो आणि रात्री 8 वाजेपर्यंत याठिकाणी खवय्यांची गर्दी असते. नोकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता या तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि आज तो चांगली कमाई करत आहे.