TRENDING:

8वा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांचा किमान पगार किती होईल? आकडे ऐकून विश्वास बसणार नाही, येणार ‘पैशांचा पाऊस’

Last Updated:

8th Pay Commission: 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे कारकूनापासून ते IAS अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या पगारात मोठी झेप दिसून येणार आहे.

advertisement
नवी दिल्ली: 8व्या वेतन आयोगाच्या लागू होण्याबाबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 7वा वेतन आयोग यंदा संपत असून पुढील वर्षीपासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या गठनाला मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. हा आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शन यामध्ये बदल करण्याच्या शिफारशी करणार आहे. त्या शिफारशींच्या आधारावर पगारात वाढ होणार आहे.
News18
News18
advertisement

पण मोठा प्रश्न असा आहे की 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कारकूनापासून ते IAS अधिकाऱ्यांपर्यंतच्या पगारात नेमकी किती वाढ होणार आहे, हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे.

8वा वेतन आयोग कधीपासून लागू होईल?

8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते यात थोडा विलंब होऊ शकतो. मात्र तरीही अंमलबजावणी 2026च्या सुरुवातीसच होण्याची शक्यता आहे.

advertisement

UPI नाही, फक्त रोख पैसे; या पोस्टरचे खळबळजनक गणित, बाजारात चालतोय गुप्त QR कोड

याआधी 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता आणि 31 डिसेंबर 2025 रोजी तो संपणार आहे. त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. जो नवीन वेतन निश्चित करेल.

8वा वेतन आयोग: फिटमेंट फॅक्टर ठरवेल पगार

advertisement

फिटमेंट फॅक्टर हेच 8व्या वेतन आयोगात पगार ठरविण्याचे मुख्य सूत्र असेल. हे सध्याच्या पगारात किती वाढ होईल, हे ठरवते. 7व्या वेतन आयोगात हे 2.57 होते. ज्यामुळे किमान पगार 7,000 वरून 18,000 रुपये झाला.

8व्या आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 होऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय आयोगावर अवलंबून असेल. कर्मचारी संघटना NC-JCM यांनी 2.86 किंवा त्याहून अधिक फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की हा 1.92 ते 2.86 च्या दरम्यान असू शकतो.

advertisement

8वा वेतन आयोग लागू झाल्यावर पगार किती होईल?

जर 2.86 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून पगाराचे अंदाज लावले तर पुढीलप्रमाणे पगार असू शकते:

कारकून (लेव्हल-1):

सध्याचा पगार: 18,000

नवीन पगार: 51,480

पेन्शन: 9,000 वरून 25,740

उद्या शेअर बाजारात 'D-Day', गुंतवणूकदारांसाठी BSEचा स्फोटक निर्णय

लेव्हल-2 कर्मचारी:

सध्याचा पगार: 19,900

नवीन पगार: 56,914

advertisement

लेव्हल-6 (मध्यम-स्तरीय कर्मचारी):

सध्याचा पगार: 35,400

नवीन पगार: 1,01,244

IAS/IPS (लेव्हल-10):

सध्याचा पगार: 56,100

नवीन पगार: 1,60,446

अर्थात ही माहिती फक्त एक अंदाज आहे. अंतिम पगार आयोगाच्या शिफारशींनुसारच ठरेल. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी देखील याच दरम्यान फिटमेंट फॅक्टर राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या/मनी/
8वा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांचा किमान पगार किती होईल? आकडे ऐकून विश्वास बसणार नाही, येणार ‘पैशांचा पाऊस’
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल