अच्युतराव शेरकर हे मूळचे बीड जिल्ह्यातील पण मुलांच्या शिक्षणासाठी 25-30 वर्षांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर शहरात स्थायिक झाले. या ठिकाणी नंतर मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि सध्याला त्यांची दोन्ही मुले नोकरी करत आहेत. पण त्यांना आधीपासूनच स्वतःचा काहीतरी व्यवसाय करण्याची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी निर्णय घेतला की मला व्यवसाय करायचाय. त्यांना शुद्ध तेल घालायचा व्यवसाय करायचा होता. सुरुवातीला त्यांच्या निर्णयाला त्यांच्या घरातल्यांचा प्रचंड विरोध होता. त्यांच्या घरातल्यांचे म्हणणे असे होते की, तुमचे वय झाले आहे या वयात तुम्हाला व्यवसाय करणे शक्य नाही पण ते त्यांच्या मतावरती ठाम होते व्यवसाय करायचा.
advertisement
त्यांनी निर्णय घेतला की आता मला देखील व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना या व्यवसाय करण्याची प्रेरणा ही डॉक्टर राजू दिक्षित यांच्याकडून त्यांना मिळाली. त्यांनी ठरवले की आपण आता शुद्ध तेल घेण्याचा व्यवसाय सुरू करावा. त्याकरता त्यांनी नाशिक येथे जाऊन ट्रेनिंग देखील घेतली आणि संभाजीनगर येथे बीड बायपास परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी या ठिकाणी इकोप्युरीटी नावाने स्वतःचा शुद्ध तेल खाण्याचा व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांचा घाण्यातील तेल देखील मिळते आणि लेटेस्ट जी हायड्रोप्लेस नावाची मशीन आहे त्याचे देखील शुद्ध तेल त्यांच्याकडे आहे.
सात ते आठ प्रकारचे तेल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये सूर्यफूल, करडई, खोबरेल तेल, मोहरीचे तेल, बदामाचे तेल, शेंगदाणा तेल असे सर्व प्रकारचे तेल ते विक्री करतात. यामध्ये एक लिटर, दोन लिटर, दहा लिटर अशा सर्व यामध्ये तेल विक्रीसाठी आहेत. सध्याला याच्या माध्यमातून ते महिन्यासाठी चांगले उत्पन्न कमवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घरच्यांचा त्यांना सुरुवातीला विरोध होता पण आता सर्व घरातले सदस्य त्यांना यासाठी मदत करतात. त्यांच्याकडे कुठलेही काम करण्यासाठी बाहेरचा माणूस नाही आहे घरातील सर्व लोक मिळून हा व्यवसाय करतात.
अच्युतराव शेरकर म्हणतात की, कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा खचून जाऊ नका कुठल्याही व्यवसायाला सेट व्हायला तुम्हाला किमान तीन वर्षे द्यावे लागतात. मी माझ्या वयाच्या 67 व्या वर्षी या व्यवसायाची सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्ही देखील माझ्याकडून प्रेरणा घेऊन कुठलाही व्यवसाय नक्कीच करू शकता, असे ते म्हणाले आहेत.