मुंबई : 21 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी एक तास व्यवहार झाला. मात्र आता 22 ऑक्टोबर रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. पण का बंद राहणार आणि पुढे बाजार कधी ओपन होणार याबद्दल मोठी अपडेट आली आहे.
advertisement
22 ऑक्टोबर रोजी NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) आणि BSE (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) दोन्ही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. ही सुट्टी दिवाळीनंतरच्या बालिप्रतिपदा (Balipratipada) या सणानिमित्त जाहीर करण्यात आली आहे.
बालिप्रतिपदा ज्याला गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट असेही म्हटले जाते. हा दिवाळीच्या पाच दिवसीय उत्सवातील चौथा दिवस आहे आणि विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी बँका, सरकारी कार्यालये तसेच वित्तीय बाजार बंद असतात. त्यामुळे NSE आणि BSE दोन्हीने 22 ऑक्टोबरला ‘ट्रेडिंग हॉलिडे’ जाहीर केला आहे.
कोणते मार्केट्स राहतील बंद
इक्विटी मार्केट (शेअर बाजार) : पूर्णपणे बंद राहील
F&O (फ्युचर्स अँड ऑप्शन्स) : व्यवहार होणार नाहीत
करन्सी मार्केट (चलन बाजार) : बंद राहील
कमोडिटी मार्केट (MCX) : फक्त संध्याकाळी सत्र (संध्या. ५ नंतर) खुले राहील, तर सकाळचे सत्र बंद असेल
दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगनंतर बाजार बंद
21 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नियमित व्यवहार बंद होते. मात्र या दिवशी विशेष मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) सत्र आयोजित करण्यात आले होते. हे सत्र दुपारी 1:45 ते 2:45 या वेळेत झाले — जे भारतीय गुंतवणूकदारांसाठी नवीन संवत (विक्रम संवत 2082) ची शुभ सुरुवात दर्शवते. या मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदार पारंपरिकरित्या काही निवडक शेअर्समध्ये प्रतीकात्मक गुंतवणूक किंवा खरेदी करतात.
पुढील सुट्ट्या
22 ऑक्टोबरनंतर वर्ष 2025 मध्ये शेअर बाजारांना फक्त दोन सुट्ट्या उरतील :
5 नोव्हेंबर (बुधवार) : गुरु नानक जयंती / प्रकाश पर्व
25 डिसेंबर (गुरुवार) : ख्रिसमस
यानंतर बाजारातील पुढील सुट्ट्या 2026 च्या नवीन कॅलेंडर हॉलिडे लिस्टनुसार असतील.