TRENDING:

पहाटे पावणे चारला बाजारात गुंतवले 11 लाख अन् झोपी गेला; सकाळी उठल्यावर जे काही घडलं त्याची गावभर चर्चा

Last Updated:

AI Trading Bot: एआय (AI) ट्रेडिंग बॉटने केलेल्या विश्लेषणाच्या जोरावर एका ट्रेडरने झोपेतून उठण्यापूर्वीच हा ३०० टक्क्यांहून अधिक नफा कमावल्याने इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement
मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) चा वापर कोणत्या क्षेत्रात होत नाही असा प्रश्न पडतोय. एआयच्या जगात अनेक थक्क करणारी घटना वेगाने व्हायरल होत आहे. अशात आता एका एआय ट्रेडिंग बॉटने केवळ काही तासांच्या कालावधीत सुमारे 11 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 40 लाख रुपयांत केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना एका ट्रेडरने 'X' वर शेअर केल्यानंतर उघडकीस आली आणि त्यानंतर इंटरनेटवर एकच चर्चा सुरू झाली.
News18
News18
advertisement

या ट्रेडरने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या एआय सिस्टमने पहाटे 3:47 च्या सुमारास त्याला एक अलर्ट पाठवून झोपेतून जागे केले. ओपनकॉ (OpenCaw) एजंट नावाच्या या बॉटने सुचवले की सध्या विविध मार्केटमध्ये 12,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 11 लाख रुपये गुंतवण्याची मोठी संधी आहे. ट्रेडरने अर्धवट झोपेतच तो अलर्ट पाहिला, ट्रेडला मंजुरी दिली आणि तो पुन्हा झोपी गेला. काही तासांनंतर जेव्हा तो जागा झाला, तेव्हा या ट्रेडिंग बॉटने 43,800 डॉलर्स म्हणजेच सुमारे 40 लाख रुपयांचा नफा कमावला होता.

advertisement

हे संपूर्ण ट्रेडिंग केवळ काही तासांत पार पडले. हा एआय एजंट विशेषतः 'पॉलीमार्केट' (Polymarket) सारख्या प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्मसाठी विकसित करण्यात आला होता. जगातील विविध डेटा सोर्सेसवर हा बॉट सतत लक्ष ठेवून असतो. जेव्हा एखादी महत्त्वाची जागतिक बातमी येते, पण मार्केटमधील किमती अजून त्या बातमीनुसार अपडेट झालेल्या नसतात, तेव्हा हा बॉट त्या संधीचा फायदा घेतो. हा एआय सिस्टम जपान सरकारची फीड, युरोपियन संसदेचे लाइव्ह स्ट्रीम, ऑस्ट्रेलियातील आर्थिक बातम्या, फ्लाईट ट्रॅकिंग डेटा आणि आशियाई मध्यवर्ती बँकांच्या घोषणा अशा अनेक ठिकाणांहून माहिती संकलित करत असतो.

advertisement

या स्ट्रॅटेजीला तांत्रिक भाषेत 'टाइम-झोन आर्बिट्राज' असे म्हटले जाते. जगाच्या एका भागात घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या भागातील बाजारपेठेत दिसण्यासाठी जो वेळ लागतो, त्या वेळेचा फायदा एआय घेते. मानवी मेंदूला जितक्या वेगाने डेटा प्रोसेस करणे शक्य नाही, तितक्या वेगाने एआय माहिती वाचून मार्केट अपडेट होण्यापूर्वीच ट्रेड यशस्वी करते. सध्या क्रिप्टो मार्केटमध्ये 5 ते 15 मिनिटांचे शॉर्ट टर्म मार्केट खूप लोकप्रिय होत आहेत, जिथे किमतीत होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा फायदा हे ऑटोमेटेड बॉट्स घेतात.

advertisement

एआय ट्रेडिंग बॉट ही मुळात एक स्वयंचलित प्रणाली आहे. यात दरवेळी माणसाला निर्णय घेण्याची गरज नसते. हे सॉफ्टवेअर इंटरनेटवरील बातम्या, सरकारी घोषणा आणि सोशल मीडियावरील हालचालींचे सतत स्कॅनिंग करते. जेव्हा जगातील एखाद्या घटनेमुळे मार्केटमध्ये बदल होणार हे निश्चित होते, तेव्हा बॉट त्वरित स्वस्त किमतीत पोझिशन्स खरेदी करतो आणि किंमत वाढताच नफा कमवून ट्रेड बंद करतो. एका वेळी हा नफा कमी वाटत असला तरी, तासाला शेकडो ट्रेड्स केल्यामुळे ही रक्कम मोठी होते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
पहाटे पावणे चारला बाजारात गुंतवले 11 लाख अन् झोपी गेला; सकाळी उठल्यावर जे काही घडलं त्याची गावभर चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल