या वर्षी सोन्याच्या दरांनी 10 ग्रॅमचा दर एक लाखापर्यंत पोहचला असला तरी ज्वेलरी रिटेलर्सना दागिन्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज आहे. कल्याण ज्वेलर्स, पीपी ज्वेलर्स बाय पवन गुप्ता, झेन डायमंड्स, इरस्वा आणि Akoirah by Augmont सारख्या ब्रँड्स मेकिंग चार्जवर डिस्काउंट, फिक्स्ड प्राईस ऑप्शन, एक्सचेंज स्कीम आणि प्रत्येक खरेदीवर सोन्याचे नाणे व इतर ऑफर देत आहेत.
advertisement
सोन्याच्या ज्वेलरीवर बंपर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर
कल्याण ज्वेलर्सवर गोल्ड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, ग्राहकांना जुने सोनं एक्सचेंज करण्याची संधी आहे. ज्यामध्ये त्याची प्युरिटी चेक केली जाईल आणि नवीन डिझाईनमध्ये बदलता येईल. कंपनीने एडवांस पर्चेस स्कीमही सुरू केली आहे, ज्यामुळे ग्राहक सोन्याच्या किमतीतील चढ-उतारापासून वाचू शकतात.
Zen Diamond ब्रँड 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक खरेदीवर 1 ग्राम 24 कॅरेटचा सोन्याचे नाणं देत आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नील सोनावाला यांनी सांगितले की, सोन्याच्या किमतीत वाढ असूनही ग्राहकांचा आकर्षण कायम आहे. तसेच, ऑनलाइन ज्वेलरी सेल्समध्ये गेल्या एका वर्षात 30-50 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि डिजिटल एंगेजमेंट ज्वेलरी व्यवसायासाठी आवश्यक बनले आहे.
लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँड Jewelbox ने 30 टक्क्यापर्यंत डायमंड्सवर डिस्काउंट आणि 20 टक्केपर्यंत मेकिंग चार्जवर डिस्काउंट जाहीर केला आहे. तसेच, Akoirah by Augmont ब्रँड सेल्फ-गिफ्टिंग ट्रेंडवर फोकस करत आहे. यामध्ये ग्राहकांकडून हलक्या आणि रोजच्या जीवनात वापरता येणाऱ्या ज्वेलरी डिझाईन्सची निवड करत आहेत.
चांदीच्या वस्तूंना मागणी...
चांदीच्या मागणीतही वाढ झाली आहे, विशेषतः पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पारंपरीक वस्तूंना चांगली मागणी आहे. कल्याण ज्वेलर्सनुसार, चांदीची थाळी, कलश आणि छोटी मूर्ती यांसारख्या वस्तूंमध्ये ग्राहकांकडून मागणी आहे. अक्षय्य तृतीया हा ज्वेलरी व्यवसायासाठी वर्षातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सोन्याच्या दागिन्यांची, वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते.