होंडा कंपनीची अॅक्टिवा 110 cc ची स्कूटी आहे. सध्याला स्कूटीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. सर्व लेटेस्ट फीचर या गाडीमध्ये आहेत. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे की या गाडीला सोबत स्मार्ट की ही येते. या स्मार्ट कीमुळे आपण गाडी ब्लॉक आणू शकतो. या गाडीला डीएफटी मीटर हे दिलेलं आहे. तसंच या गाडीला मोबाईलचं चार्जिंगसाठी सॉकेट देखील दिलेलं आहे.
advertisement
Akshaya Tritiya 2025: ... तर सोन्याचे दर 85 हजारांवर येतील, अक्षय तृतीयेला सराफा बाजारात काय स्थिती?
तसेच गाडीला स्मार्ट स्टँड देखील दिलेला आहे. म्हणजेच ती जर स्टँड तुमचं खाली असेल तर गाडीही चालू होणार नाही. डीएफटी मीटरमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी या दिसतील जसं की गाडी किती किलोमीटर चालली, किती पेट्रोल आहे तसं सर्व नेव्हिगेशन हे देखील आहे. तसंच यामध्ये तुम्ही सर्व इतरही गोष्टी ॲड करू शकता. डिजिटल मीटर आहे, एलईडी लाईट आहे. ऑलॉय व्हील येणार आहेत. तसेच 5.3 लिटर हा पेट्रोल टॅंक देखील आहे. तसेच डिकी देखील गाडीची मोठी आहे.
या गाडीची शोरूम किंमत आहे 96 हजार 117 रुपये आहे. एक लिटरमध्ये ही गाडी 55 किलोमीटर जाऊ शकते. फुल स्मार्ट अशी ही एक्टिवाची 110cc ची गाडी आहे. तुम्हाला देखील ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता.