सिएटल: Amazon सुमारे 14,000 कॉर्पोरेट पदांवरून कर्मचाऱ्यांना कमी करत आहे. 2022 ते 2023 दरम्यान झालेल्या 27,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर महामारीनंतरची ही त्यांची सर्वात मोठी नोकर कपात आहे. ही कपात Amazon च्या 350,000 white-collar कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4% आहे आणि कंपनीने $18 अब्ज तिमाही नफा कमावलेला असतानाही ही घडत आहे.
advertisement
प्रभावित कर्मचाऱ्यांना 28 ऑक्टोबरच्या सकाळी कंपनीच्या HR विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गालेटी (Beth Galetti) यांच्याकडून ईमेलद्वारे Termination Notices प्राप्त झाल्या.
HRचा 14,000 कर्मचाऱ्यांसाठी पाठवलेला ईमेल
'बिझनेस इनसाइडर'च्या (Business Insider) मते, कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ईमेलमध्ये पुढील तात्काळ करावयाच्या गोष्टी आणि support packages याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
संपूर्ण ईमेल
माझ्याकडे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी एक महत्त्वाची, पण कठीण बातमी आहे. संस्थेच्या प्राधान्यक्रमांचा आणि भविष्यात आम्हाला कशावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. याचा सखोल आढावा घेतल्यानंतर आम्ही Amazon मधील काही roles काढून टाकण्याचा कठोर व्यावसायिक निर्णय घेतला आहे. दुर्दैवाने तुमची भूमिका काढून टाकली जात आहे आणि नोकरी न करण्याच्या कालावधीनंतर (non-working period) तुमचा रोजगार संपुष्टात येईल.
आम्ही हे निर्णय सहज घेतलेले नाहीत आणि या काळात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामध्ये पूर्ण वेतन आणि भत्त्यांसह (लागू असल्यास) नोकरी न करण्याचा कालावधी, सेवा समाप्ती पॅकेजची (severance package) ऑफर, देशानुसार लागू होणारे Transitional benefits आणि अनेक कौशल्य प्रशिक्षणे तसेच बाह्य नोकरी प्लेसमेंटसाठी मदत यांचा समावेश असेल.
तुम्हाला कदाचित प्रश्न असतील आणि त्यांची उत्तरे देण्यासाठी आम्ही येथे आहोत. तुमच्या टीममधील लीडर आणि/किंवा HR प्रतिनिधींसोबत तुमच्या Transitionalच्या गोष्टींवर आणि आम्ही तुम्हाला कशी मदत देऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी लवकरच Chime मीटिंगचे आमंत्रण मिळेल. ही मीटिंग ऐच्छिक असली तरी आम्ही तुम्हाला virtually पद्धतीने उपस्थित राहण्याची विनंती करतो. कारण यामुळे तुमच्या वैयक्तिक प्रश्नांचे निराकरण करण्याची संधी मिळेल.
तुमचा बॅज ॲक्सेस बंद केला गेला आहे. त्यामुळे तुम्ही सध्या Amazon च्या ऑफिसमध्ये असाल, तर तुम्हाला इमारतीतून बाहेर पडण्यासाठी सुरक्षा (Security) मदत करेल. या संभाषणाव्यतिरिक्त तुम्ही MyHR मध्ये कधीही अतिरिक्त माहिती आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) पाहू शकता.
आतापासून तुम्हाला Amazon च्या वतीने काम करणे आवश्यक नाही आणि पुढील 90 दिवसांसाठी तुम्हाला तुमचे पूर्ण वेतन आणि लाभ (लागू असल्यास) मिळतील. या Transitional कालावधीत तुमच्या वैयक्तिक डिव्हाइसवर तुम्हाला अंतर्गत ईमेल, Chime आणि A to Z मध्ये प्रवेश मिळत राहील आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ईमेल उपलब्ध असेल.
तुम्ही अजून A to Z ॲप डाउनलोड केले नसल्यास...
तुम्हाला MyHR सारख्या महत्त्वाच्या प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी त्याची आवश्यकता असेल. जिथे तुम्हाला सहाय्यक संसाधने, लाभ, वेतन, तुमच्या कार्यस्थळावरून कोणतेही वैयक्तिक सामान कसे परत मिळवायचे आणि Amazon-ने दिलेले उपकरणे कशी परत करायची याबद्दल FAQs मिळतील.
A to Z कसे स्थापित करायचे, MyHR कसे ॲक्सेस करायचे आणि Chime व ईमेलमध्ये कसे प्रवेश करायचा याबद्दल अतिरिक्त माहिती तुम्हाला या पृष्ठावर मिळेल. कृपया तुमचा वैयक्तिक ईमेल पत्ता A to Z मध्ये अद्ययावत असल्याची खात्री करा आणि तुमच्या Yubikey ला जपून ठेवा जेणेकरून तुम्ही वैयक्तिक संगणक/मोबाइल डिव्हाइसवर अंतर्गत ईमेलमध्ये प्रवेश करू शकाल. लक्षात ठेवा की, टीम सदस्य MyHR किंवा कर्मचारी सहाय्यता पोर्टल (EAP) द्वारे 24/7 तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहेत. जे A to Z ॲपमध्ये विनामूल्य आणि गोपनीय आहे.
तुम्हाला आवश्यक असलेली गोष्ट मिळवण्यात कोणतीही अडचण आल्यास मग ती कनेक्टिव्हिटीची समस्या असो, पुढील प्रोसेसबाबत प्रश्न असोत किंवा इतर कोणतीही चिंता असो, कृपया या ईमेलला उत्तर द्या. या बदलातून जात असताना तुम्हाला आवश्यक ती मदत मिळेल यासाठी मी वैयक्तिकरित्या वचनबद्ध आहे.
धन्यवाद,
बेथ गालेटी SVP, लोक अनुभव आणि तंत्रज्ञान (People Experience & Technology)
या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांच्या बॅजचा ॲक्सेस तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आणि गरज पडल्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून त्यांना इमारतीतून बाहेर काढले जाईल असेही नमूद केले. प्रभावित कर्मचाऱ्यांना 90 दिवसांचे पूर्ण वेतन आणि लाभ, सेवा समाप्ती पॅकेजेस (severance packages) आणि नोकरी प्लेसमेंट मदत मिळेल.
लवकरच आणखी कपातीची शक्यता
Amazon ची मजबूत आर्थिक कामगिरी असूनही गालेटी यांनी नोकर कपातीचे समर्थन करत म्हटले आहे की- AI ची ही पिढी इंटरनेटनंतर आपण पाहिलेले सर्वात परिवर्तनकारी तंत्रज्ञान आहे. कंपनी नोकरशाही कमी करण्याची आणि flatten organizational hierarchies करण्याची योजना आखत आहे. तसेच जनरेटिव्ह AI गुंतवणुकीकडे संसाधने वळवत आहे.
या कपातीची वेळ अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. Amazon ने गेल्या तिमाहीत $18 अब्ज नफा कमावला आणि यावर्षी $120 अब्जाहून अधिक भांडवली खर्च (capital expenditures) करण्याची योजना आखत आहे, जी 2024 च्या तुलनेत जवळपास 50% अधिक आहे. CEO अँडी जॅसी (Andy Jassy) यांनी जूनमध्येच या कपातीचे संकेत दिले होते. कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता की AI मुळे कार्यक्षमतेत (efficiency) वाढ झाल्याने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या अपरिहार्यपणे कमी होईल कारण कंपनीला आज केली जाणारी काही कामे करण्यासाठी कमी लोकांची गरज असेल.
रॉयटर्सने (Reuters) यापूर्वी Amazon एकूण 30,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली होती. ज्यामुळे अतिरिक्त कर्मचारी कपातीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने (The New York Times) सूत्रांचा हवाला देत सांगितले आहे की- सुट्ट्यांच्या खरेदीच्या (holiday shopping) हंगामानंतर जानेवारीत आणखी एक कपात अपेक्षित आहे.
